धक्कादायक; मुलीने आईचेच केले तुकडे; आणि तीन महिने राहिली त्या तुकड्यांसोबत…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मुंबईतून समोर आली आहे. लालबाग परिसरात एक तरुणी चक्क आपल्या आईच्या तुकडे केलेल्या मृतदेहाबरोबर गेल्या तीन महिन्यांपासून राहत होती. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तरूणीला बुधवारी अटक केली आहे. वीणा जैन असं मृत महिलेचं, तर रिंपल जैन असं अटक करण्यात आलेल्या तरूणीचं नाव आहे.

तरुणीचा चुलत भाऊ मंगळवारी तिच्या घरी पैसे देण्यासाठी गेला होता. यावेळी भावाने आई बद्दल विचारणा केली असता, ती कानपूरला गेल्याचं तिने म्हटलं. पण, यावर त्याला संशय आल्याने त्याने रिंपलला दरवाजा उघडण्यास सांगितलं. आणि जेव्हा तो घरात गेला, त्याला दुर्गंधी परसल्याचं दिसलं.

यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घराची पाहणी केली असता, दुर्गंधीचा तपास केला असता एका छोट्या टाकीत हात आणि पाय सापडले. याची तात्काळ माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत रिंपलला ताब्यात घेण्यात आलं. तर, मृतदेह केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला, असं पोलिसांनी सांगितलं.

रिंपलेने आईच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर दुर्गंधी लपण्यासाठी २०० परफ्यूम घेतले होते. जेव्हा विकत घेण्यासाठी बाहेर जायची, तेव्हा शेजारचे दुर्गंधीबाबत बोलायचं. तेव्हा रिंपल स्टीलच्या टाकीवर परफ्यूम फवारायाची. तसेच, शेजारी आईबाबत सातत्याने विचारत असल्याने तिने बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला होता.

झोन ४ चे डीसीपी प्रवीण मुंढे म्हनानले कि, याबाबत तपासादरम्यान कटर, कोयता आणि सुरी सापडला आहे. संशयित आरोपी सतत तिचे विधान बदलत आहे. तिच्यावर कलम ३०२ आणि २०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.