Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»गुटखा मिळत नाही म्हणून तुकाराम मुंढेंना शिवीगाळ
    गुन्हे वार्ता

    गुटखा मिळत नाही म्हणून तुकाराम मुंढेंना शिवीगाळ

    परप्रांतीय चालकाचा अश्लील भाषेत व्हिडीओ करत विरोध
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 24, 2026Updated:June 24, 2026No Comments577 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यात एकीकडे अनेक ठिकाणी छापेमारी करून भेसळ रोखण्याचं काम करणाऱ्या तुकाराम मुंढे यांचं कौतुक सुरू असलं तरी काही भुरट्या आणि विकृत लोकांकडून त्यांच्याविरोधात राग व्यक्त केला जात असल्याचं चित्र आहे. कल्याणमध्येही असाच काहीसा प्रकार घडला. कोणत्याही टपरीवर गुटखा मिळत नाही म्हणून एका परप्रांतीय व्यक्तीने तुकाराम मुंढे यांच्याविरोधात व्हिडीओ करत त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला. दुर्गाप्रसाद पांडे असं आरोपीचं नाव असून खडकपाडा पोलिसांनी त्याला गजाआड केलं आहे.

    अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात गुटखा बंद केला असून गुटखा विक्री करण्याऱ्याच्या विरोधात मोक्का लावण्याचं जाहीर केलं आहे. तुकाराम मुंढे यांच्या या इशाऱ्यामुळे बहुतांश ठिकाणी गुटखा बंद झाला आहे. कल्याणमध्येही हे चित्र आहे.

    गुटखा मिळत नाही या रागातून दुर्गाप्रसाद पांडे या ओला कॅब चालकाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यामध्ये या पांडेने तुकाराम मुंढे यांना अश्लील आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचं दिसून आलं. मात्र ही शिवीगाळ या पांडेला चांगलीच महागात पडल्याचं दिसून आलं. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अवघ्या चार तासांत या विकृताचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

    गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुटख्याची टंचाई निर्माण झाल्याने आणि एफडीएच्या कडक कारवाईमुळे गुटखा मिळत नसल्याने आरोपी दुर्गाप्रसाद पांडे प्रचंड नाराज होता. त्यातच त्याच्या वडिलांची टपरी देखील बंद झाली होती. या सर्व गोष्टींचा राग मनात धरून त्याने थेट एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ करणारा व्हिडीओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

    हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. कल्याण परिमंडळचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक मारुती आंधळे आणि पोलीस अधिकारी भूषण देवरे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून अवघ्या 4 तासांच्या आत आरोपीला अटक केले.

    अटक करण्यात आलेला दुर्गाप्रसाद पांडे हा कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी परिसरात राहणारा असून तो व्यवसायाने ओला कॅब चालक आहे. सध्या खडकपाडा पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif