“तू झूठी मैं मक्कार” चित्रपटाने दोन दिवसात जमा केला इतक्या कोटींचा गल्ला…

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

अभिनेत्री श्रद्दा कपूर (Shraddha Kapoor) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे जोडी आपल्याला मनोरंजन करतांना दिसत आहे. त्यांच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र येत आहे. आणि या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावला आहे. ८ मार्च रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेला सिनेमा आता बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम रचताना दिसत आहे. दिग्दर्शक लव रंजन दिग्दर्शित ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाने दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाता बोलबाला दिसत आहे.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर ‘तू झूठी, मैं मक्कार’ सिनेमा बुधवारी प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर विश्लेषकांपासून चाहत्यांपर्यंत सर्वांनी सिनेमाचं कौतुक केलं आहे. सिनेमातील श्रद्धा आणि रणबीर यांच्यातील रोमांटिक केमिस्ट्री आणि विनोद प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १५.७३ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या दिवशी सुट्टी नसतानाही बॉक्स ऑफिसवर सिनेमाने मोठी कमाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.