Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»ट्रम्प यांना अचानक नरेंद्र मोदी यांची आठवण
    राजकारण

    ट्रम्प यांना अचानक नरेंद्र मोदी यांची आठवण

    उंचावल्या भुवया; म्हणे मी आणि मोदी मिळून..
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 27, 2026Updated:March 30, 2026No Comments498 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला. 6 एप्रिलपर्यंत युद्धबंदीची अमेरिकेने घोषणा केली. मात्र, अमेरिकेच्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नक्की काय आहे हे कळत नाहीये. युद्धात डोनाल्ड ट्रम्प एकटे पडल्याचे दिसत आहे. इराणकडून होर्मुज मार्ग बंद करण्यात आल्याने जगातील तेल पुरवठा जवळपास ठप्प झाल्याचे बघायला मिळाले. भारतातही एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. भारताच्या मदतीला अनेक देश पुढे आले. भारतात स्थिती नियंत्रणात असून कच्च्या तेलाचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले.

    भारतात एलपीजी गॅसचे जहाज कसे जास्तीत जास्त येतील, याकरिता भारत प्रयत्न करत आहे. हेच नाही तर भारत सध्याच्या घडीला इराणकडूनही एलपीजी गॅसची खरेदी करत आहे. भारताची या युद्धात भूमिका अगदी स्पष्ट आहे. कोणत्याही स्थितीत युद्ध रोखले पाहिजे, असे भारताकडून वारंवार सांगितले जात आहे.

    डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर संवाद दोन दिवसांपूर्वीच झाला. यादरम्यान आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक करण्यात आले. संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मिळून कोणत्याही समस्येतून मार्ग काढू शकतो, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

    डोनाल्ड ट्रम्प यांना अचानक नरेंद्र मोदी यांची आठवण झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. भारतातील अमेरिकी दूतावास यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा मेसेज देत म्हटले की, भारतासोबत आमचे जुने संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी आम्ही दोघे असे आहोत, जे कोणत्याही समस्येतून मार्ग काढू शकतात.

    यापेक्षा दुसरे काही बोलण्याची अजिबात गरज नाही. मंगळवारीच डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांना नक्की कोणत्या समस्येतून नरेंद्र मोदी यांच्यासोबत मिळून मार्ग काढायचा आहे हे कळू शकले नाही. मध्य पूर्वेत कोणत्याही परिस्थितीमध्ये शांतता असायला हवी, ही भारताची भूमिका आहे. त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प यांना नरेंद्र मोदी यांची आठवण आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!

    April 17, 2026

    उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!

    April 17, 2026

    माणसाने झेपेल तितकेच बोलावे!

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.