पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळ्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर ट्रक-महिंद्रा पिकप गाडीचा समोरासमोर अपघात झाल्याने त्यात एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली.
दिनांक २७ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर तालुक्यातील विचखेडे गावाजवळ जळगावहून धुळ्याकडे जाणारी ट्रक क्रं, एमएच १५ जीव्ही ७८२७ ही भरधाव वेगाने समोरून धुळ्याकडून पारोळ्याच्या दिशेला येणारी महिंद्रा पिकप एम एच १९ सीवाय ५०७६ वर येऊन धडकली त्यात पिकअप चालक रफिक अहमद शरीफ अहमद (४०), अखिल अहमद अब्दुल सत्तार रा धुळे, पूजा राजेश बागुल (२५) रा सिद्धार्थ नगर पारोळा हे जखमी झाले तर रविंद्र कौतिक बागुल (५०) रा नगरदेवळा यांचा जागीच मृत्यू झाला.
नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिका चालक आशुतोष शेलार यांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळ गाठुन जखमींना पारोळा कुटीर रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल केले. दरम्यान रविंद्र बागुल हे आपल्या वहिनींना धुळे येथे दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले होते, उपचार करून ते घरी येत असताना ही घटना घडली. यामुळे पारोळा शहरातील सिद्धार्थनगर येथे शोककळा पसरली. याबाबत पारोळा पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली असून पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.
दोन दिवसात चार आपघात
दरम्यान या रस्त्याचे काम कासव गतीने सुरू असुन दोन दिवसात चार आपघात झाल्याची माहिती मिळाली. विचखेडे गावाजवळ गुरूवारी रात्री दहा वाजता तसेच शनिवारी रात्री साडेतीनच्या सुमारास दोन वाहनांच्या अपघात झाला होता. त्यात युवक गौरव नारायण पाटील वय ३०, सुजित पावरा, यश पावरा, लविष पावरा सर्व राहणार धुळे हे जखमी झालेत. रस्त्याचे कासव गतीने काम व चुकीचा दिशादर्शक फलकामुळे दोन दिवसांत चौथा अपघात झाला आहे. यास जवाबदार कोण असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.