Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»ट्रकची दुचाकीला धडक मजूर ठार; एक गंभीर
    अपघात

    ट्रकची दुचाकीला धडक मजूर ठार; एक गंभीर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 25, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पहूर ता. जामनेर

    छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने मजुरांच्या दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एक मजूर जागीच ठार झाला असून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ वरील साई हॉटेलसमोर सोमवारी दुपारी सुमारे ४.१५ वाजता घडला.

    शेतातून मका कापणीचा सौदा करून घरी परतत असताना ईश्वर भानुदास सोनवणे (वय ४५) व शाम यादव चौधरी (वय ३०) यांच्या दुचाकीला (क्रमांक एमएच १९ डीबी २९५०) मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने (क्रमांक एमएच २० सीटी ८०५३) जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकी चेंडूप्रमाणे सुमारे ७ ते १० फूट उंच उडाली. या अपघातात मागे बसलेले ईश्वर सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक शाम चौधरी गंभीर जखमी झाले. समोरून येणाऱ्या आणखी एका दुचाकीस्वारालाही ट्रकची धडक बसली; मात्र प्रसंगावधान राखून उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला.

    महामार्गावरील सद्दाम शेख व सचिन पाटील यांनी तात्काळ जखमींना आपल्या दुचाकीवरून सरकारी दवाखान्यात हलवले. दरम्यान, पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला इमरान भाई या ऑटोचालकाने पाठलाग करून मेट्रो वाईन शॉपजवळ पकडले. मद्यप्राशन करून ट्रक चालविणाऱ्या चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मयताचे भाऊ ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक दिलीप प्रभाकर राखटे (करंजखेडा, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या ईश्वर सोनवणे यांच्या निधनाने शिवनगर परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी १०.०० वाजता शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जखमी शाम चौधरी यांना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

    #injured #truck accident Agriculture Chhatrapati Sambhajinagar Death farmer jalgaon laborer two-wheeler
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तापमानाने ओलांडली चाळीशी!

    March 10, 2026

    पोलिस कॉन्स्टेबलने संपविले जीवन!

    March 9, 2026

    भारनियमनामुळे बळीराजा हतबल!

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.