Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»आदिवासी नेत्याला जीवे मारण्याची धमकी
    जळगाव जिल्हा

    आदिवासी नेत्याला जीवे मारण्याची धमकी

    अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 4, 2026No Comments572 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    आदिवासी समाजाचे नेते लकी जाधव यांना सोशल मीडियावर अपमानास्पद भाषा वापरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित आरोपी अक्की चव्हाण व त्याच्या साथीदारांवर अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, २८ एप्रिल २०२६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील धामणगाव देव येथे मुंगसाजी महाराजांचे दर्शन घेऊन परत येत असताना कोहळा गावाजवळ काही व्यक्तींनी लकी जाधव यांच्या वाहनाला अडवले. यावेळी लखन पवार, तुषार जाधव व त्यांच्या साथीदारांनी जाधव यांना जातीवाचक शिवीगाळ करत धमक्या दिल्याचा आरोप आहे. “आदिवासी हक्कांबाबत बोललास तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देण्यात आल्याचे साक्षीदारांनी सांगितले आहे.

    घटनेनंतर अक्की चव्हाण नावाच्या युवकाने इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून लकी जाधव यांच्याबद्दल आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य केले. या व्हिडिओमधील भाषेतून अप्रत्यक्षपणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे लकी जाधव यांच्या जिवितास धोका निर्माण झाल्याचे सांगत त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.

    दरम्यान संबंधित आरोपींवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास अपेक्षित आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026

    ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif