Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»अफगाणिस्तानमधील भूकंपाचे भारतात हादरे
    अपघात

    अफगाणिस्तानमधील भूकंपाचे भारतात हादरे

    दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीरसह उत्तर भारतात धक्के
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 28, 2026Updated:June 28, 2026No Comments130 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाल्याची घटना घडली आहे. हा भूंकप संध्याकाळी 7 वाजता झाला असून या भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल होती. दरम्यान, या भूकंपाचे हादरे भारतात देखील अनेक राज्यांना बसले आहेत. दिल्लीपासून काश्मीरपर्यंत या भूकंपाचे धक्के दानवले.

    दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीरसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंप निरीक्षणासाठी भारत सरकारची नोडल एजन्सी असलेल्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने भूकंपाची तीव्रता 6.2 नोंदवली. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये असल्याचे मानले जात आहे. रिश्टर स्केलवरील भूकंपाच्या या तीव्रतेमुळे व्हेनेझुएला आणि फिलीपिन्समध्ये अलीकडेच झालेल्या भूकंपांची आठवण झाली एनसीएसनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.2 होती.

    भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, हा भूकंप उत्तर आणि पूर्व अफगाणिस्तानमधील जुर्मच्या 43 किमी दक्षिणेस झाला. या धक्क्यांमुळे राजधानीच्या काही भागांमध्ये घबराट पसरली, ज्यामुळे लोकांना घरे आणि कार्यालयांमधून बाहेर पडावे लागले. व्हेनेझुएलामध्ये काही दिवसांपूर्वीच झालेल्या दोन भूकंपांच्या धक्क्यांनंतर हा भूकंप झाला आहे, ज्यात 920 लोकांचा मृत्यू झाला आणि हजारो लोक जखमी झाले. बुधवारी संध्याकाळी अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने दोन शक्तिशाली भूकंप झाले, ज्यामुळे दक्षिण अमेरिकेत इमारती कोसळल्या. 50 हजाराहून अधिक लोक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. अनेक देश व्हेनेझुएलाच्या नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाची खोली जमिनीच्या पृष्ठभागापासून तब्बल 215 किलोमीटर खोल होती. केंद्र अतिशय खोलवर असल्याने या भूकंपाचे धक्के खूप मोठ्या क्षेत्रावर पसरले. अफगाणिस्तान व्यतिरिक्त भारत (उत्तर भारत), पाकिस्तान, चीन, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांना भूकंपाचे तीव्र धक्के बसले.

    भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा भूकंपाचे केंद्र जमिनीच्या खूप आत (खोलवर) असते, तेव्हा त्याचे धक्के अतिशय विस्तृत प्रदेशात जाणवतात; मात्र, जमिनीच्या वरच्या भागातील इमारती आणि वित्तहानीचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता असते. या भूकंपामुळे अद्याप कोणत्याही प्रकारच्या जीवित किंवा वित्तहानीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दुर्गम डोंगराळ भाग असल्याने प्रशासन नुकसान झाले आहे का, याचा आढावा घेत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

    August 11, 2026

    खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!

    August 11, 2026

    भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif