Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    • गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण
    जळगाव

    अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

    हरित महाराष्ट्र अभियानात ३०० रोपांच्या लागवडीसह ४ हजार सीड बॉलची पेरणी
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 16, 2026Updated:August 16, 2026No Comments39 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    हरित महाराोष्ट्र अभियानांतर्गत अनुभूती निवासी स्कूल, जळगाव वनविभाग आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व सीड्स बॉल पेरणी उपक्रम उत्साहात पार पडला. अनुभूती निवासी स्कूलच्या पाठीमागील राखीव वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४०७ येथे झालेल्या या उपक्रमात शाळेतील १८७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्थानिक वृक्षप्रजातींच्या ३०० रोपांची लागवड केली. तसेच करंज, कांचन, बूच, बांबू, रिठा आदी वृक्षप्रजातींच्या ४ हजार सीड्स बॉलची पेरणी ही केली.

    राखीव वनक्षेत्रातील जैवविविधता वाढविणे, स्थानिक वृक्षप्रजातींचे संवर्धन करणे आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देणे, हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. हा उपक्रम जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

    वृक्षारोपणावेळी अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबाशिष दास, विक्रांत जाधव, वनविभागाचे क्षेत्रीय अधिकारी स्वप्नील गोसावी, जैन इरिगेशनच्या वन व पर्यावरण विभागाचे राजेंद्र राणे, सुरक्षा अधिकारी एस. एस. भुसांडे, डॉ. समीर पवार, गार्डन विभागाचे संदीप पाटील, गिरीश जगताप, विठ्ठल बारी, शुभम काळे, अजय जाधव, आकाश कोळी उपस्थित होते.

    विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला. या उपक्रमामुळे राखीव वनक्षेत्रातील हरित आच्छादन वाढण्यासोबतच जैवविविधतेच्या संवर्धनाला चालना मिळणार असून, विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि पर्यावरणाविषयीची जाणीव अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026

    ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif