Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ब्रेकिंग»पाकिस्तानमध्ये पूर्ण ट्रेनच हायजॅक, सहा सैनिक ठार
    ब्रेकिंग

    पाकिस्तानमध्ये पूर्ण ट्रेनच हायजॅक, सहा सैनिक ठार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 11, 2025Updated:March 11, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर आलीय. पाकिस्तानमधील बलोच आर्मीने संपूर्ण ट्रेनच हायजॅक केली. दशतवाद्यांनी रेल्वेतील 450 जणांना ओलीस ठेवले होते. त्यानंतर रेल्वेत असणाऱ्या इतर सर्व प्रवाशांना सोडून देण्यात आले. परंतु 140 सैनिक, आयएसआय कर्मचारी आणि पोलिसांना ओलीस ठेवले आहे. त्यात आयएसआय आणि पाकिस्तानी लष्काराचे कर्मचारी आहेत. रेल्वेला अपहरणकर्त्यांकडून सोडवण्यासाठी गेलेल्या पाकिस्तानी लष्करातील सहा सैनिकांचा मृत्यू झाला आहे. सैन्य कारवाई केली तर प्रवाशांना ठार करण्यात येईल, असा इशारा बलोच आर्मीने दिला आहे.

    ओलिसांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवाद विरोधी दल (एटीएफ) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) चे कर्मचारी आहेत. हे सर्वजण रजेवर पंजाबला जात होते. ट्रेनमध्ये उपस्थित सैनिकांनी कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास सर्व ओलीस ठार केले जातील, असा इशारा बीएलएने दिला आहे.

    दरम्यान, रेल्वेचे अपहरण केल्यानंतर बलोच आर्मीने महिला, मुले यांना सोडून दिले. माहितीनुसार, बीएलएची फिदायन युनिट, मजीद ब्रिगेड या मोहिमेचे नेतृत्व करत आहे. ज्यामध्ये फतेह पथक, एसटीओएस आणि गुप्तचर शाखा जिराब यांचा समावेश आहे.

    रेल्वे हायजॅक केल्यानंतर बलोचिस्तान लिबरेशन आर्मीने वक्तव्य दिले आहे. आमच्या सैनिकांनी आधी ट्रेनचे ट्रॅक बॉम्बने उडवले. त्यामुळे रेल्वे थांबली. रेल्वे थांबताच्या आमच्या सैनिकांनी ट्रेन संपूर्ण नियंत्रण घेतले. पाकिस्तानी लष्कर काही कारवाई करण्याचा विचार करत असेल तर ओलीस ठेवलेले  140 प्रवाशी वाचणार नाही. बलोच आर्मीने पाकिस्तान लष्कराला गंभीर इशारा दिला आहे. आमच्याविरोधात लष्करी कारवाई केली तर त्याचे गंभीर परिणाम होतील. आमच्यावर हल्ला झाला तर सर्व  140 प्रवाशी मारले जातील. त्याची संपूर्ण जबाबदारी पाकिस्तानी लष्काराची असणार आहे.

    बलुचिस्तानमधील फुटीरतावादी संघटना अनेक दिवसांपासून पाकिस्तानविरोधात लढा देत आहेत. हा भाग अतिरेकी कारवायांचे केंद्र बनला आहे, जिथे पाकिस्तान सरकारवर सातत्याने हल्ले होत आहेत. काही दिवसांपूर्वी बलुच गटांनी पाकिस्तान आणि चीनविरोधात नव्याने हल्ला करण्याची घोषणा केली होती. बलुच गटाने अलीकडेच सिंधी फुटीरतावादी गटांसोबत युद्ध सराव पूर्ण केला होता.

     

    Train hijack in Pakistan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

    August 1, 2026

    मुक्ताईनगरात ट्रकमधून 340 लिटर डिझेल चोरी

    July 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif