Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»उपचारासाठी आलेल्या ९ जणांवर काळाचा घाला
    अपघात

    उपचारासाठी आलेल्या ९ जणांवर काळाचा घाला

    मध्यरात्री २ वाजता हॉटेलमध्ये लागली भीषण आग
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 19, 2026No Comments441 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील मिर्झा गालिब स्ट्रीट परिसरातील एका हॉटेलमध्ये मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची भीषण घटना घडली. या आगीत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, मृत झालेले बहुतांश नागरिक हे उपचारासाठी कोलकात्यामध्ये आलेले बांगलादेशी नागरिक होते. धुरामुळे गुदमरून अनेक जण बेशुद्ध पडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    मध्यरात्री सर्वजण गाढ झोपेत असताना हॉटेलमध्ये आग भडकली. अचानक ही आग लागल्याने हॉटेलमध्ये मोठा गोंधळ आणि पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे आणि आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम तातडीने सुरू केले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि अग्निशामक दल या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

    मध्यरात्री २ वाजता मिर्झा गालिब स्ट्रीट परिसरातील एका हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना समोर आली होती. पण ती आग इतकी वाढली की जवळच्या अनेक हॉटेल्समध्ये पसरली. घटनास्थळी अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक अहवालानुसार, ही आग एअर-कंडिशनरच्या स्फोटामुळे लागली असावी असा अंदाज वर्तवला जातोय. पण आगीचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही.

    आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या चार ते ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आपत्ती व्यवस्थापन पथकही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि अखेरीस आगीवर नियंत्रण मिळवले. पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा कोलकाता येथील हॉटेलला आग लागली आहे. तारापीठ येथील हॉटेल विदेशिनीला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026

    दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली

    September 6, 2026

    नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif