Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»बापरे!  15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू
    अपघात

    बापरे!  15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

    इस्लामाबादमधील रुग्णालयात भीषण अग्नितांडव
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 26, 2026No Comments172 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एका रुग्णालयाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 16 नवजात बालकांपैकी तब्बल 15 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एका बालकाला सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. ही घटना पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) येथील स्त्रीरोग विभागातील नर्सरीमध्ये घडल्याची माहिती आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास रुग्णालयातील नर्सरीमध्ये अचानक आग लागली. त्यावेळी या ठिकाणी 16 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. आगीची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, आगीने काही वेळातच गंभीर स्वरूप धारण केल्याने मोठी दुर्घटना घडली.

    बचाव पथकाच्या प्राथमिक माहितीनुसार, नर्सरीमध्ये असलेल्या एअर कंडिशनरच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर आग वेगाने पसरल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीचे नेमके कारण आणि घटनेतील इतर बाबींचा तपास सुरू आहे.

    या दुर्घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नवजात बालकांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. रुग्णालय प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची चौकशी केली जात आहे. दरम्यान, भारतातील अमरावती येथेही अलीकडेच रुग्णालयातील आगीची घटना समोर आली होती. त्यामुळे रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026

    13 दिवस उलटले तरीही हजारो नागरिक बेपत्ताच!

    September 8, 2026

    भीषण अपघातात पिकअपचा चक्क चेंदामेंदा

    September 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif