Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»बापरे! पर्यटकांचे विमान कोसळून १३ जणांचा मृत्यू
    अपघात

    बापरे! पर्यटकांचे विमान कोसळून १३ जणांचा मृत्यू

    तांत्रिक बिघाडामुळे विमान शेतात कोसळून लागली आग
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 2, 2026No Comments735 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    दक्षिण अमेरिकेतील पेरू देशात एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. प्रसिद्ध पर्यटनाचे केंद्र असलेल्या ‘नाझका लाईन्स’ परिसरात पर्यटकांना घेऊन जाणारे एक छोटे विमान कोसळल्याने विमानातील १३ जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये परदेशी पर्यटकांसह विमानातील वैमानिकांचा समावेश आहे. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे हे विमान थेट जमिनीवर कोसळले आणि त्याला भीषण आग लागली.

    शनिवारी पेरू देशातील नाझ्का शहराजवळ एका शेतात पर्यटक विमान कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. TOI च्या वृत्तानुसार, मृतांमध्ये पायलट, को पायलटसह ११ प्रवाशांचा समावेश आहे. इका प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या नाझ्का लाइन्सवरून हवाई सफर करत असताना विमान कोसळले. त्या भागात वाळूचे वादळ आल्याच्या दुसऱ्या दिवशी हा अपघात घडला.

    नाझ्का अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे विमान जवळच्या इका शहरातून निघाले होते. ते पेरूच्या एरोडियाना या विमान कंपनीद्वारे चालवले जात होते. एअरलाइनच्या वेबसाइटनुसार, ही कंपनी गेल्या १४ वर्षांपासून सेसना ग्रँड कॅराव्हॅन विमानांचा वापर करून नाझ्का लाइन्सवरून निसर्गरम्य हवाई सफरी आयोजित करत आहे.

    स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार, विमानाने उड्डाण घेतले होते, ते नाझ्का विमानतळाजवळ पोहोचत असताना त्याचा संपर्क तुटला. पेरूच्या व्यापार आणि पर्यटन मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, शनिवारी कोसळलेल्या विमानात ११ परदेशी पर्यटक आणि दोन कर्मचारी होते. सरकारी वृत्तसंस्था एजन्सिया अँडिनाने दिलेल्या वृत्तानुसार, विमानात दोन जर्मन, दोन स्पॅनिश आणि सात इटालियन पर्यटक होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif