Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»शिव कॉलनी पुलाच्या कामासाठी वाहतूक वळवणार!
    जळगाव

    शिव कॉलनी पुलाच्या कामासाठी वाहतूक वळवणार!

    जळगावकरांनो लक्ष द्या : पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 6, 2026No Comments390 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    शहरातील शिव कॉलनीतील रेल्वे मार्गावरील समांतर पूल आणि भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, या कामामुळे जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या संदर्भात 10 ऑगस्टनंतर महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महावितरण आणि महारेलचे अधिकारी संयुक्त पाहणी करून अंतिम वाहतूक आराखडा निश्चित करणार आहेत.

    जळगाव शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक असलेल्या जुन्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खोदकाम आणि पुलाच्या संरचनेचे काम हाती घेतले जाणार असल्याने वाहतूक सुरळीत ठेवणे हे प्रशासनापुढील मोठे आव्हान आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून वाहतूक कोणत्या मार्गाने वळवायची, कोणत्या ठिकाणी बॅरिकेडिंग करायचे आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणती उपाययोजना करायची, याचा सविस्तर आराखडा तयार केला जाणार आहे.

    प्राथमिक नियोजनानुसार शहरातून जाणारी अवजड वाहने पाळधीतरसोद बायपास मार्गे वळविण्याचा प्रस्ताव आहे. तर शहरातील चारचाकी, दुचाकी आणि इतर हलक्या वाहनांसाठी पिंप्राळा, गणेश कॉलनी आणि निमखेडी शिवार हे पर्यायी मार्ग वापरण्याचा विचार सुरू आहे. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बॅरिकेडिंग, पर्यायी रस्ते आणि इतर उपाययोजनांचे नियोजनही करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांकडून प्रत्येक मार्गाची रुंदी, वाहतूक क्षमता आणि तांत्रिक बाबींची पाहणी केली जाणार आहे.

    शिव कॉलनी उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या संथ कामामुळे नागरिकांकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जात होती. वाढती वाहतूक, धुळीचे साम्राज्य आणि अरुंद झालेल्या मार्गामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी महारेल प्रशासनाला पत्र पाठवून कामाला गती देण्याची मागणी केली होती. त्यानंतर चार महिन्यांनी महारेलचे सल्लागार अरविंद पटेल यांनी महापौरांची भेट घेऊन संपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण केले.

    कामाला वेग येणार!

    सध्या पावसामुळे मोठे बांधकाम थांबविण्यात आले असले तरी पावसाळा संपताच कामाला वेग दिला जाणार आहे. त्यामुळे काही काळ जळगावकरांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार असला, तरी भविष्यात शिव कॉलनी परिसरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif