Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»अखेर टप्पा चौकात सिग्नल कार्यान्वित : नागरिकांना दिलासा
    महाराष्ट्र

    अखेर टप्पा चौकात सिग्नल कार्यान्वित : नागरिकांना दिलासा

    आ.  देवतळे यांच्या पाठपुराव्याला यश : ‘लोकशाही’च्या वृत्ताचीही दखल
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 16, 2026No Comments346 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    भद्रावती | लोकशाही न्यूज नेटवर्क

    टप्पा चौकातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका लक्षात घेता सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी अखेर मार्गी लागली आहे. टप्पा चौकात सिग्नल यंत्रणा बसवून ती कार्यान्वित करण्यात आल्याने वाहनधारक, पादचारी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    टप्पा चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आमदार करण संजय देवतळे यांनी अधिवेशनात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर भाजयुमोचे प्रदेश सचिव इम्रान खान यांनीही टप्पा चौकात सिग्नल बसविण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती.

    या प्रश्नाला ‘लोकशाही’नेही सातत्याने वाचा फोडली होती. ९ एप्रिल २०२५ रोजी ‘टप्पा चौकात सिग्नल लावण्याची मागणी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून चौकातील वाहतूक समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.

    टप्पा चौक हा भद्रावती शहरातील वर्दळीचा प्रमुख चौक असून चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील वाहतुकीसह शहरातील अंतर्गत वाहतुकीची मोठी वर्दळ या ठिकाणी असते. त्यामुळे चौकात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत होती. नागरिक, पादचारी तसेच वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. अपघाताचा धोकाही कायम होता.

    आता सिग्नल कार्यान्वित झाल्याने चौकातील वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होणार असून कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, सिग्नल यंत्रणेची नियमित देखभाल, योग्य संचालन आणि वाहतूक नियमांचे पालन याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

    आमदार करण संजय देवतळे यांनी अधिवेशनात उपस्थित केलेला मुद्दा, इम्रान खान यांनी केलेली मागणी आणि ‘लोकशाही’ने सातत्याने केलेले वृत्तांकन यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर टप्पा चौकातील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीला आता प्रत्यक्ष स्वरूप आले असून वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या समस्येवर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif