जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
अमळनेर तालुक्यातील सावखेडा शिवार येथे चोपडा-अमळनेर रोडवर सापळा रचून देशी- विदेशी बनावट दारूसाठा वाहतूक करतांना (वाहन क्रमांक- एमएच -३० बीडी- ११०३) हे वाहन पकडण्यात आलं. वाहनासह पाच लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क, चाळीसगाव विभाग निरीक्षक के. एन. गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार ही कारवाई करण्यात आली. एका वाहनातून मोठ्या प्रमाणात बनावट देशी विदेशी दारूची वाहतूक होत आहे याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, संचालक पी.पी.सुर्वे (अं व द.), विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क नाशिक उषा वर्मा, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, जळगाव डॉ.व्ही.टी. भूकन यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली दि. 6 अमळनेर तालुक्यातील सावखेडा शिवार येथे चोपडा अमळनेर रोडवर राज्य उत्पादन शुल्क चाळीसगाव विभागाच्या वतीने सापळा लावण्यात आला.
वाहन क्रमांक एम एच -३० बी डी- ११०३ हे वाहन थांबून त्याची पाहणी केली असता या वाहनातून देशी विदेशी बनावट दारूसाठा वाहतूक करतांना मिळून आला. सदर वाहनात बनावट बनावट मद्यसाठा मिळून आला आहे. सदर अवैध बनावट मद्यसाठा व वाहन असा एकूण ५ लाख ७९ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.