लोकशाही न्यूज नेटवर्क
कॉक्रोच जनता पार्टीने शनिवारी कॉक्रोच जनता पार्टीने जंतरमंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. परंतु तिघांना पोलिसांनी विमानातून ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी तिघांसह हजारो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. सीजेपीने आंदोलन जाहीर केल्याने प्रशासनाने दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांचं जवळपास 2000 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
देशातील व्यापाऱ्यांच्या संघटनेने 10 ऑक्टोबर रोजीच्या सीजेपीच्या आंदोलनामुळे कोट्यवधींचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आंदोलनामुळे व्यवसाय ठप्प झाल्याने 2000 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे. दिल्लीच्या जंतरमंतवर वारंवार होणार्या आंदोलनामुळे व्यापाऱ्यांच्या CTI या व्यापारी संघटनेने सीजेपीसह सर्व राजकीय पक्षांना आंदोलन न करण्याची मागणी केली आहे. सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान करू नका, असं आवाहन संघटनेने केलं आहे.
सीटीआयचे अध्यक्ष बृजेश गोलय यांनी म्हटलं की, नवरात्री आणि रामलीला सुरू होत आहे. दिवाळीचा दिवस एका महिन्यावर आहे. परंतु वारंवार होणाऱ्या आंदोलनामुळे दिल्लीची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. बृजेश गोयल यांनी सीटीआयने अभिजीत दिपके यांनाही पत्र लिहिलं आहे. तसेच इतर राजकीय पक्षांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी पत्र लिहून दिवाळीपर्यंत कोणतंही आंदोलन करू नये, असं आवाहन पत्रातून केलं आहे.

