ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने ट्रॅक्टर पलटी

३५ वर्षीय चालकाचा ट्रॅक्टर खाली दाबून जागीच मृत्यू

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव तालुक्यातील वाक गावाजवळील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळूचे भरलेले ट्रॅक्टर चालवत असताना मोठे टायर फुटले यावेळी चालकाने खाली उडी मारली परंतु ट्रॅक्टरच्या खाली ३५ वर्षीय चालकच दाबला गेल्याची घटना दिनांक १७रोजी मध्यरात्री घडली याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यासह शहरातील गिरणा नदीपात्रातून बेसुमार अवैध वाळूचे थैमान सुरूच आहे. काल रात्री गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करत असताना वाक गावाजवळील वडाच्या झाडाजवळ ट्रॅक्टर चालवत असताना ट्रॅक्टरचे मोठे टायर फुटले. दरम्यान चालक रामदास सुभाष सोनवणे (वय ३५) रा. पेठ भडगाव याने ट्रॅक्टर वरून खाली उडी मारली, परंतु ट्रॅक्टर त्याच्या अंगावर पलटी झाले.

घटना घडतच रामदास सोनवणे याला भडगाव ग्रामीण रुग्णालयाला दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय मुंडे यांनी त्यास मृत घोषित केले. भडगाव पोलीस स्टेशनला याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.