जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या चित्रफितींचे लोकार्पण

पर्यटन विभाग व लोकशाही पुणे ईओडीचा अनोखा उपक्रम  

0

 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

जळगाव जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी, पर्यटन संचालनालयाच्या वतीने पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही माध्यम समूहाच्या पुणे येथील ईओडी संस्थेने जळगाव जिल्ह्यातील महत्वाच्या २० स्थळांचे एकूण ७५ दर्जेदार व्हिडीओ तयार करण्यात आले होते. या चित्रफितींचे  लोकार्पण छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात करण्यात आले.

यावेळी लोकार्पण प्रसंगी राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन, आपत्ती व्यवस्थापन तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित आदी मान्यवर उपस्थित होते.

जळगावच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळांवर आणि जळगाव जिल्ह्यातील खाद्य संस्कृतीवर आधारित हे सर्व व्हिडीओ आपल्या जळगाव जिल्ह्यातील पर्यटनवाढी साठी महत्वाचे ठरणार असून यात जळगाव जिल्ह्याचे महत्व सांगणाऱ्या माहितीपटांसह एका गाण्याचाही देखील समावेश आहे. लोकशाही समूहाने याची निर्मिती केली असून जीवन कदम यांनी दिग्दर्शन केले आहे. यात सिने अभिनेत्री प्रिया मराठे यांचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक, पर्यटन आणि कला, संस्कृती दर्शवणारे व्हिडीओ आहेत. हे सर्व व्हिडीओ मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्ही भाषेत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वेबसाईट वर आणि जळगाव जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईट वर आज पासून प्रसारित करण्यात येत आहे.

राज्यासह राज्याबाहेरील इतर राज्यातील तसेच इतर देशातील पर्यटक जिल्ह्यात यावेत हा प्रमुख उद्देश ह्या डाक्युमेंट्री निर्मित करण्याचा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.