पारोळ्यातील २० किलोमीटर आतील नागरिकांना टोल माफी
आता २० किलोमीटरच्या आतील वाहन धारकांचा टोल भुर्दंड वाचणार
पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील सबगव्हाण जवळील टोलनाक्यावर तालुक्यातील वीस किलोमीटर अंतरावरील स्थानिकांना टोल माफी मिळणार असल्याची माहिती मा खासदार ए टी नाना पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की रस्ते व महामार्ग मंत्रालयाचे मंत्री ना नितीन गडकरी यांनी टोल नाक्यापासुन वीस किलोमीटर अंतरावरील स्थानिकांना टोल लागणार न असल्याची माहिती देण्यात आली होती. या पार्श्वभुमीवर जळगाव जिल्हा खाजगी लहान वाहनांना, महामार्ग संचालनालयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत टोल लागणार नाही. माजी खासदार ए टी पाटील यांच्या प्रयत्नामुळे गेल्या आठ ते दहा महिन्यापासून दगडी सबगव्हण येथे सुरू झालेला हा टोल नाका टोल वसूल करीत आहे.
त्यात पारोळा शहर व टोल जवळील ग्रामीण भागातील खाजगी लहान चार चाकी वाहनांना मासिक पास घेण्यास बंधनकारक करीत होते. त्यामुळे कधीकाळी एखादेवेळी प्रवास करणाऱ्या वाहनधारकाला विनाकारण टोलचा भुर्दंड बसत होता. महामार्ग अधिकाऱ्यांना निवेदने देऊन काही फरक पडत नव्हता व न्याय मिळत नव्हता. पारोळ्यातील नागरिकांनी माजी खासदार एटी पाटील यांच्याकडे मागील अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या म्हणून माजी खासदार ए. टी. पाटील यांनी गेल्या महिन्यापासून या विषयावर संबंधितांशी संपर्क साधून प्रयत्न केले. तसेच नितीन गडकरी यांनी स्थानिक टोल नाका २० किलोमीटरच्या आतील वाहन धारकांना टोलचा भुर्दंड बसू नये. असे आदेश काढले असल्याची माहिती संबंधितांना दिली.
याप्रसंगी टोल व्यवस्थापक नरेंद्र खैरनार यांना तेथे पत्रकार परिषद मध्ये बोलवून पारोळा शहर व टोल नाक्यापासून ग्रामीण भागातील २० किलोमीटरच्या आतील कोणत्याही चार चाकी धारकाला टोल लागू नये याकरिता धारेवर धरून त्यांच्याकडून तोल मुक्त असे वदवुन घेतले. नरेंद्र खैरनार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, जो पर्यंत महामार्ग व्यवस्थापन यांच्याकडून आदेशाची प्रत येत नाही तो पर्यंत स्थानिक नागरिकांनी येथील रहिवासी दाखला म्हणून आधार कार्ड व वाहनांचे कागज पत्र दाखविल्यास टोल लागणार नाही असे आश्वासन दिले.
यावेळी टोल व्यवस्थापक नरेंद्र खैरनार, शरद चौधरी उपस्थित होते. तर पत्रकार परिषदेत तर माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. अतुल मोरे, भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील, शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, सरचिटणीस सचिन गुजराथी, माजी तालुका चिटणीस धीरज महाजन, विनोद हिंदुजा, भावडू राजपूत, समीर वैद्य यांच्यासह डॉ. सचिन बडगुजर, प्रा. डॉ. संजय भावसार, दिनेश गुजराथी, व शहरातील स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.
टोल प्रोजेक्ट मॅनेजर यांच्याशी भ्रमणध्वनी संवाद
पत्रकार परिषदेत राष्ट्रीय महामार्गाचे जनरल मॅनेजर शिवाजी पवार तसेच टोल प्रोजेक्ट मॅनेजर लतीफ शेख यांच्याशी भ्रमणध्वनी वरून मा खासदार ए टी नाना पाटील यांनी संवाद साधत केंद्र सरकारने जारी केलेल्या सूचनांचे अधीन राहून निर्णय होईपर्यंत विस किलोमीटरच्या आतील स्थानिक वाहन धारकांना आधार कार्ड व आरसी बुकच्या आधारे टोल माफी करावी. अश्या सूचना संबंधित टोल नाका व्यवस्थापक यांना दिल्या त्यांनी तसे पत्रकार परिषदेत सांगितले.