Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»फक्त तीन हजारमध्ये वर्षभर टोलमुक्त प्रवास!
    राष्ट्रीय

    फक्त तीन हजारमध्ये वर्षभर टोलमुक्त प्रवास!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 18, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    नवी दिल्ली

    केंद्रीय रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज, बुधवारी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे फास्ट स्टॅग बद्धलची घोषणा केली. वाहनचालकांसाठी लवकरच फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू होणार आहे. या नव्या योजनेंतर्गत वाहनधारकांना 3 हजार रुपयात वर्षभर (200 ट्रीप) टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. आगामी 15 ऑगस्ट 2025 पासून ही योजना लागू होईल.

    श्री. गडकरींनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केल्यानुसार आगामी 15 ऑगस्टपासून सुरू होणारी ही पास केवळ गैर-व्यावसायिक खासगी वाहनांसाठी उपलब्ध असेल. पास सक्रिय केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा 200 फेऱ्या पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल) वैध राहील. वार्षिक पासमुळे देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरून सहज आणि किफायतशीर प्रवास करता येईल, असे गडकरींनी म्हटले आहे.

    नवीन धोरण

    नवीन धोरण 60 किलोमीटरच्या परिघात असलेल्या टोलनाक्यांसंदर्भातील जुन्या समस्यांचे निराकरण करते आणि एकाच, परवडणाऱ्या व्यवहाराद्वारे टोल भरणे सुलभ करते. टोलनाक्यांवरील वेळ कमी करणे, वाहतूक कोंडीतून सुटका करणे आणि टोल प्लाझावरील वाद कमी करणे यासह लाखो खासगी वाहन मालकांना जलद आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देणे, हा या वार्षिक पासचा उद्देश असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. इच्छुकांना ‘राजमार्ग यात्रा’ या अधिकृत ॲपद्वारे हा पास ॲक्टिवेट करू शकतील. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट्सवरूनही पास मिळवता येईल.

    15 August August Nitin Gadkari Toll Toll-free travel Union Minister for Road Transport and Highways
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    सोनम वांगचुक यांच्या पत्नीची थेट दिल्ली हायकोर्टात धाव

    July 19, 2026

    हिमाचल प्रदेशसह जम्मू काश्मीर मध्ये महाभयंकर तांडव!

    July 19, 2026

    सोनम वांगचूक हे ‘फुंगसूक वांगडू’ नाहीत : आमिर खान

    July 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif