Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अपहरणाच्या संशयावरून तरुणाची तलवारीसह दहशत
    गुन्हे वार्ता

    अपहरणाच्या संशयावरून तरुणाची तलवारीसह दहशत

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 17, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अपहरणाच्या संशयावरून तरुणाची तलवारीसह दहशत

    जळगाव प्रतिनिधि

    शहरातील वाल्मिक नगर परिसरात अपहरणाच्या संशयावरून एका तरुणाने हातात तलवार घेऊन गोंधळ घातल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजता घडली. या तरुणाने धार्मिक स्थाल्च्य परिसरातील पाण्याचे माठ आणि प्लास्टिकच्या टाकीची तोडफोड केली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयिताला अटक केली. त्यानंतर पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा झाले, त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    वाल्मिक नगरातील एका घराबाहेर अल्पवयीन मुलगा खेळत असताना काही अनोळखी व्यक्ती त्या भागात आल्या. त्यांच्यावर मुलाच्या अपहरणाचा संशय आल्याने परिसरातील नागरिक सतर्क झाले. या दरम्यान, प्रवीण रमेश कोळी (वय ३०, रा. पिंजारीवाडा, वाल्मिक नगर) या तरुणाने आपल्या घरातून धारदार तलवार घेतली आणि संशयितांच्या दिशेने धाव घेतली. त्याला पाहून संशयित तिथून पळून गेले.

    संशयित व्यक्ती गेल्याचे समजल्यानंतर प्रवीण कोळी तलवार घेऊन तिथे पोहोचला. त्याने तिथे ठेवलेले पाण्याचे माठ आणि प्लास्टिकच्या टाकीवर तलवारीने वार करत तोडफोड केली. त्याच्या या कृत्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

    घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोहेकॉ. गिरीश पाटील, गजानन पाटील आणि अनिल कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रवीण कोळीला ताब्यात घेतले. मात्र, यानंतर दोन्ही गटातील नागरिक पोलीस ठाण्यासमोर जमले, त्यामुळे तणाव निर्माण झाला.

    परिसरातील तणाव लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी त्यांच्याशी चर्चा करत तातडीने कारवाईची मागणी केली. त्यानुसार, अपहरणाचा संशयित प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, तलवारीसह तोडफोड व दहशत निर्माण करणाऱ्या प्रवीण रमेश कोळीविरुद्धही गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif