Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»धानोरा परिसरात वाघाचा वावर?
    जळगाव

    धानोरा परिसरात वाघाचा वावर?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 22, 2025No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धानोरा, ता. चोपडा
    धानोरा परिसरात पुन्हा एकदा वन्यजीवांच्या हालचालींनी शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सकाळी शेतात वाघाच्या पायांचे ठसे स्पष्टपणे आढळून आले असून वनविभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी सुरू केली आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी शुक्रवारी सायंकाळी वाघीणीचे दर्शन झाल्याचे सांगितल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
    गेल्या काही महिन्यांपूर्वी देवगाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान मुलीचा मृत्यू झाल्यानंतर वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतरही धानोरा, पारगाव, देवगाव व मितावली शिवारात बिबट्या आणि वाघ यांच्या हालचाली सातत्याने दिसून येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत शंका निर्माण होत आहेत.
    शुक्रवारी देवगाव रोडवर गणपत काठियावाडी यांच्या वाड्यासमोर वाघीण रस्त्यावरून गेल्याचे काही गावकऱ्यांनी पाहिल्याचे सांगितले. या घटनेची चर्चा रातोरात पसरल्यानंतर शनिवारी सकाळी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान शेतामध्ये आढळलेल्या वाघाच्या पगमार्क्सची नोंद घेण्यात आली आहे. या ठशांच्या आधारे वाघीणीचा वावर देवगाव, पारगाव आणि धानोरा या पट्ट्यात असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.
    वनविभागाकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी, महिला व विशेषतः संध्याकाळी अथवा पहाटे शेतात जाणाऱ्या व्यक्तींनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वनविभागाने परिसरात गस्त वाढवण्यासह कॅमेऱ्याद्वारे हालचालींचे निरीक्षण करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. परिसरात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणामुळे रहिवाशांनी वनविभागाने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे. दरम्यान, वाघीणीचा वावर नेमका कुठपर्यंत पसरला आहे याचा सखोल तपास वनविभागाकडून सुरू असून पुढील काही दिवस हा परिसर विशेष देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif