अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या अधिकारी, पोलिसांवर दगडफेक?

सार्वजनिक बांधकाम विभागाने १ कोटी ९३ लाख रुपयाला लावला चुना!

0

 

चुंचाळे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यावर असलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यासाठी गेलेल्या अधिकारी,कर्मचाऱ्यांवर दगडफेक झाल्याने तालुक्यात जोरदार चर्चा सुरू असून याबाबत शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल होतो किंवा नाही याकडे संपूर्ण शासकीय अधिकारी कर्मचारी वर्गाचे लक्ष लागून असले तरी या पुलाच्या बांधकामात सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेवर नियोजन पूर्वक काम न केल्याने शासनाच्या तिजोरीला १ कोटी ९३ लाख रुपयाचा चुना लावल्याचे आणि न्यायालयाचा अवमान केल्याचे सुद्धा बोलले जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,यावल तालुक्यात वड्री हरिपुरा रस्त्यावर १ कोटी ते ९३ लाख रुपये खर्च करून पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे परंतु पुलाच्या पुढे सरळ रेषेत अतिक्रमण काढणे बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेवरच कारवाई न केल्यामुळे पुलाच्या पुढेच अतिक्रमण राहिल्याने पुढील रस्त्याचे बांधकाम अपूर्ण राहिले बांधकाम पूर्ण होण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता तडवी व त्यांचे कर्मचारी यावल पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यासाठी जानेवारी २०२५ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्या ठिकाणी गेले असता शासकीय कामकाजात अडथळा आणून त्यांच्यावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.

याबाबत यावल तालुक्यात शासकीय अधिकारी कर्मचारी वर्गात,राजकारणात तसेच नागरिकांमध्ये,ग्रामस्थांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.आणि याबाबत यावल पोस्टेला गुन्हा दाखल होतो किंवा नाही,या प्रकरणात अतिक्रमण काढणे संदर्भात न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा अतिक्रमण न काढले गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने न्यायालयाचा सुद्धा हवामान केला आहे किंवा कसे..? तसेच पुलावर १ कोटी ९३ लाख रुपयेचा खर्च करण्याच्या आधी सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजनपूर्वक अतिक्रमण काढणे संदर्भात काय काय कारवाई केली आहे किंवा नाही..? किंवा अतिक्रमण काढणे बाबत कोणत्या उद्देशाने आणि कारणास्तव समन्वय साधला गेला आहे का..? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून यापुढे काय..? संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.