Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात
    राजकारण

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल : मनसेवर जोरदार टीका
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 10, 2026Updated:May 10, 2026No Comments212 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    गुणरत्न सदावर्ते यांनी अनेकदा राज ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. ते सातत्याने राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर जोरदार टीका करत असतात. दरम्यान शनिवारी या विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाल्याची पहायला मिळाली. शनिवारी गुणरत्न सदावर्ते जालन्याच्या दौऱ्यावर होते, यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाई फेक केली. तसेच त्यांच्या गाडीवर सुपारी देखील फेकण्यात आली. त्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. मनसेकडून गाडीवर शाईफेक झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनसे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येत आहे. पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

    ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाई आणि सुपार्‍या फेकल्या प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनसेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह तिघांवर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या फिर्यादीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम  126(2), सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत रस्ता अडवणे, अवैध पद्धतीने जमाव जमवून घोषणाबाजी करणे, त्याचसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करणे अशा विविध प्रकरणात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान आता या प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यात आहे.

    शनिवारी दुपारी जालना शहरातल्या विशाल कॉर्नर परिसरात ही घटना घडली होती. मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत, गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाई तसचे सुपाऱ्या फेकल्या होत्या.  या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मनसेवर गंभीर आरोप केले होते. या घटनेत जे द्रव्य फेकण्यात आले होते, त्यामध्ये केमिकल होते, त्यांचा मारण्याचा उद्देश होता का? असा सवाल यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता.  तसचे राज ठाकरे यांनी आपल्यासोबत वौचारिक चर्चा करावी असं थेट आव्हान देखील यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केलं होतं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ओमानच्या समुद्रात तेलवाहू जहाजावर मोठा हल्ला

    June 9, 2026

    अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडले

    June 9, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif