Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार
    जळगाव

    युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार

    कृष्णभक्तीतून समानतेचा जागर : ढोलपथकाचा दणदणाट, रिदमिक योगा, रोप मल्लखांब, मर्दानी खेळ. नृत्य ठरले आकर्षण
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 6, 2026No Comments74 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    ढोलपथकाच्या दणदणाटात, रिदमिक योगा, रोप मल्लखांब, मर्दानी खेळ आणि कृष्णभक्तीने नटलेल्या नृत्याविष्कारातून शिवतीर्थ मैदानावर युवतींच्या दहीहंडीने नारीशक्तीचा अद्वितीय जागर घडवला. गोपिकांनी साहस, समता आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम साकारत मानवी मनोऱ्यांतुन दहीहंडी फोडली, तर महिलांच्या कर्तृत्वाला कृतज्ञतेची मानवंदना देत प्रत्येक युवतीने प्रेरणादायी आयुष्य घडवावे, असा संदेश हजारो जळगावकरांना या उत्सवातून देण्यात आला.

    यंदा प्रथमच रोख पारितोषिके प्रथम तिन संघांना देण्यात आले. प्रथम क्रमांकाचे एल एच पाटील पब्लिक स्कूल या संघाला ३१ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकाचा नुतन मराठा महाविद्यालय संघाला २१ हजार १११ रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या जी. एच. रायसोनी महाविद्यालय संघाला ११ हजार १११ रुपये अशी एकूण ६३ हजार ३३३ रुपयांची रोख पारितोषिके वाटप करण्यात आली ही पारितोषिके जैन इरिगेशनने प्रायोजित केली होती. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मंजुषा भिडे, कामिनी धांडे, नेहा देशमुख यांनी काम पाहिले. उत्कृष्ट साहसी खेळाचे प्रदर्शन करणाऱ्यांना व सहभागी सर्व संघाला विशेष स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

    याप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, आमदार सुरेश भोळे, महापौर दिपमाला काळे जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधिक्षक श्रीकांत ढिवरे, पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे, अप्पर पोलीस पोलीस अधीक्षक संदीप गावित, मनपा आयुक्त आदित्य जिवने, बांधकाम व्यवसायिक अनिश शहा, बीएसएनएलचे व्यवस्थापक गोविंद प्रसाद गुप्ता, गोदावरी फाऊंडेशन च्या डॉ. केतकी पाटील, डॉ. जयवंत नागुलकर, यांच्यासह उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी व युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडिया व सदस्य उपस्थित होते. तसेच समितीच्या अध्यक्ष डॉ. सीमा पाटील, उपाध्यक्ष उषा जैन, कार्याध्यक्षा डॉ. सोनाली महाजन, स्वागत समिती प्रमुख डॉ. कल्याणी नागूलकर व सचिव प्रा. क्षमा सराफ, खजिनदार निलम जोशी, स्वागत समिती सदस्य रूपाली वाघ, डॉ. अनिता पाटील, हर्षाली चौधरी, सोनाली पाटील, लेफ्टनंट डॉ. हेमाक्षी वानखेडे, मिनल जैन यांचीही उपस्थिती होती

    शौर्यवीर’ आणि ‘महाबली’ या दोन ढोल पथकांतील तब्बल २१३ ढोलवादक दमदार वादनाने वातावरण दणाणून सोडले होते. मर्दानी खेळ, चिमुकल्यांचे सांस्कृतिक नृत्य, रिदमिक योगा, लाईव्ह सिंगिंग, स्लाईन डीजे, लेझर शो आणि आकर्षक फटाक्यांची आतषबाजी हे प्रमुख आकर्षण ठरले. यशस्वीतेसाठी भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन च्या सर्व सहकारी यांनी सहकार्य केले. अय्याज मोहसीन यांनी सूत्रसंचालन केले.

    ६८५ महिला गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी

    युवतींची दहीहंडी २०२६’मध्ये किड्स गुरूकूल इंटरनॅशनल, अनुभूती स्कूल, आर. आर. विद्यालय, केसीई सोसायटी मुलींचे वसतिगृह, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय, एस. ए. बाहेती महाविद्यालय, त्रिमूर्ती महाविद्यालय, के. सी. ई. इंजिनिअरिंग कॉलेज, हरिजन कन्या छात्रालय, एल. एच. पाटील पब्लिक स्कूल, के‌. के. इन्स्टीट्यूट आफ योगा, एकलव्य क्रीडा संकुल आदी शाळा-महाविद्यालयांतील 13 महिला गोविंदा पथकांमधील तब्बल ६८५ युवती सहभागी झाले होते. सहभागी युवतींच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली होती.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif