Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»शैक्षणिक»पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश
    शैक्षणिक

    पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 4, 2026No Comments54 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव

    गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उज्ज्वल परंपरा जोपासणाऱ्या अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील भार्गवी रुपेश पवार, काव्या शामकांत पाटील, विद्या विनोद बागुल या वि‌द्यार्थिनी शहरी सर्वसाधारण गटाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या आहेत.

    विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन तसेच विद्यालयाच्या प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी कौतूक केले. या विद्यार्थिनींना राजेंद्र बावस्कर, चित्रलेखा अत्तरदे, वंदना मारकड, गीतांजली काळे या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

    आर्थिक व सामाजिकदृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासावर विशेष भर दिला जातो. शिष्यवृत्ती परीक्षेच्या अनुषंगाने वि‌द्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग, नियमित सराव परीक्षा, विविध प्रश्नपत्रिकांचा अभ्यास तसेच वैयक्तिक शैक्षणिक मार्गदर्शनाचे प्रभावी नियोजन करण्यात आले होते.

    वि‌द्यार्थिनींनी नियमित व नियोजनबद्ध अभ्यास, सातत्यपूर्ण सराव आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा प्रभावी उपयोग करून हे उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थिनींची जिद्द, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि वि‌द्यालयाचे गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण यांच्या एकत्रित प्रयत्नांतून मिळालेले हे यश विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीतील आणखी एक गौरवास्पद पर्व ठरले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif