भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

रावेर येथील तिघांचा समावेश : झाडाला धडकून गाडीचा चेंदामेंदा

0

जळगाव : जिल्ह्यामध्ये अपघाताच्या प्रमाणात दररोज वाढ होताना दिसत आहे. यातच मित्राच्या बहिणीच्या हळदीवरुन परत येत असताना मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास सावदा-पिंपळ रस्त्यावर चारचाकी वाहनाने झाडाला जोरदार धडक दिल्याने तिघे जण जागीच ठार झाले, तर अन्य दोघे जण गंभीर जखमी असल्याची घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की होंडा कंपनीच्या गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील पाच मित्र भुसावळ येथील एका मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. भुसावळकडून सावदा मार्गे रावेरकडे येत असताना त्यांच्या एमएच 20 सीएस 8002 गाडीने भरधाव वेगात झाडाला जोरदार टक्कर दिली. यात रावेर शहरातील शुभम सोनार (वय 25) मुकेश रायपूरकर (वर 23) सह अजून एक जण ठार झाला आहे. दोघे जयश भोई, गणेश भोई (फोटोग्राफर) जखमी असून जळगाव येथील हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. अपघाताची वार्ता रावेर शहरात पसरताच एकच खळबळ उडाली. हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. जळगाव जिल्ह्यात दररोज अपघातामध्ये मयत होण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. यातच वाहन वेगाने चालवणे, वळणावर वाहन नियंत्रणात न ठेवणे या कारणांमुळे असे अनेक अपघात होत आहेत. सावदा पिंपळ रस्ता दरम्यान हा अपघात झाला तोही गाडी भयंकर वेगात असणार किंवा चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हे वाहन झाडावर जोरात आढळून अक्षरशः वाहनाचे तुकडे तुकडे झालेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.