Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»एमपीएससी पेपरफुटीविरोधात तीन दिवसांचा अल्टिमेटम
    महाराष्ट्र

    एमपीएससी पेपरफुटीविरोधात तीन दिवसांचा अल्टिमेटम

    मागण्या मान्य न झाल्यास ‘जंतरमंतर’सारख्या आंदोलनाचा इशारा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 8, 2026Updated:September 8, 2026No Comments54 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अठरा ते वीस तास अभ्यास करून पारदर्शक परीक्षेची अपेक्षा करणाऱ्या स्पर्धा परीक्षार्थींना पेपरफुटीचा फटका बसला आणि त्यांचा राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीवरील विश्वास उडाला. संतप्त झालेल्या स्पर्धा परीक्षार्थींनी सोमवारी हजारोंच्या संख्येने मोर्चा काढत राज्य सरकारला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आणि मागण्या मान्य न झाल्यास पुण्यात जंतरमंतरची पुनरावृत्ती करण्याचा थेट इशारा दिला.

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील कथित गैरप्रकार, पेपरफुटीच्या विरोधात आणि पारदर्शकतेच्या मागणीसाठी पुण्यात ओंकारेश्वर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला झालेली गर्दी ही धडकी भरवणारी असल्याचे दिसून आले. या वेळी मोर्चात खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, आमदार विश्वजित कदम, माजी आमदार मोहन जोशी, मेहबूब शेख यांच्यासह स्पर्धा परीक्षार्थींचे प्रतिनिधी, क्लासचालक आदी सहभागी झाले होते.

    रोहित पवार म्हणाले, की विद्यार्थ्यांमध्ये आयोगाच्या कारभाराबाबत किती आक्रोश आहे, हे आजच्या गर्दीतून दिसून येते. विद्यार्थ्यांची मागणी आहे की, आयोगाच्या अध्यक्षांनी आणि सचिवांनी राजीनामा द्यावा. त्यांच्या जागी चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती ही व्हायला पाहिजे. या प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी बोलावल्यास विद्यार्थी आणि शिक्षकांचे शिष्टमंडळ जाईल. मी जाणार नाही. पण, जर त्यांना फसवले तर आम्ही सगळे रस्त्यावर उतरू.

    एमपीएससीतील येवले, नखाते आणि इतर अधिकाऱ्यांवरही त्यांनी निशाणा साधला. २०१४ पासून ते एकाच ठिकाणी असून, पीएसआय अंतर्गत परीक्षेतही मासकॉपी करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. टीईटी, नीट, सीईटी, सरळ सेवा, कृषी सेवा परीक्षेतही भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा पवारांनी केला. तसेच, येत्या तीन दिवसांत तोडगा न काढल्यास स्पर्धा परीक्षार्थींच्या पालकांना घेऊन जंतरमंतरसारखे आंदोलन करण्याचा इशारा दिला.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif