घरफोडी करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

काही दिवसांपूर्वी शहरातील मास्टर कॉलनीत बंद घरातून ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास झाली होती. या प्रकरणी तीन संशयित आरोपींना ३ ऑगस्ट बुधवार रोजी रात्री १० वाजता मास्टर कॉलनी आणि तांबापुरा परिसरातून अटक करण्यात आली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, मास्टर कॉलनी येथील रहिवासी मेहरुन्नीसा शेख नियाजोद्दीन (वय-५६) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. २८ जुलै रोजी सकाळी त्यांचा मुलगा आणि सून हे कामाच्या निमित्ताने नगरदेवळा येथे गेले होते. त्यामुळे मेहरुन्नीसा ह्या शेजारी राहणाऱ्या पुतण्याकडे रात्री झोपण्यासाठी गेल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत बंद घर फोडून घरातील २० हजार रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने असा एकूण ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. या संदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना खबर मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पोलीस नाईक, सुधीर सावळे, इमरान सैय्यद, मुदस्सर काझी, जमीर शेख, सचिन पाटील, साईनाथ मुंडे यांनी कारवाई करत इश्तीयाक अली राजीक अली (वय-१९), सलीम उर्फ सल्या शेख कय्यूब (वय-२६) दोन्ही रा. तांबापुरा आणि सरजील सैय्यद हरून सैय्यद (वय-२६) रा. मास्टर कॉलनी, जळगाव तीन जणांना अटक केली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ रामकृष्ण पाटील आणि पो.ना. सचिन पाटील करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.