चार दिवसापूर्वी तीन म्हशींना चिरडले अन आता…
विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न : वाळूच्या डंपरचालकांची हिम्मत वाढली : हे घडतंय काय?
सागर महाजन
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव तालुक्यात गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक हा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. या अवैध वाळूमुळे गेल्या तीन दिवसापूर्वी अवैध वाळूच्या डंपरने तीन म्हशींना डंपर खाली चिरडून मारून टाकल्याची घटना ताजी असतानाच त्याच डंपर वरील ड्रायव्हरने भडगाव पेठ चौफुली वर विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. या बाबत दोन गंभीर गुन्हे करणारा व त्यामागचा घडवणारा अजून मोकाट कसा काय फिरत आहे? तसेच त्यावर अजून पर्यन्त गुन्हा दाखल का होत नाही? असा सवाल भडगाव शहरातील सुज्ञ नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, सामजिक कार्यकर्ते व विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी हे आज दुपारी साडेबारा दरम्यान आपल्या शेतात जात असताना भडगाव पेठ चौफुली येथे त्यांच्या डिस्कवर गाडीवर डाव्या बाजूने हळूवार जात असताना वाक् कडून भडगाव कडे विरूद्ध दिशेने भरधाव वेगात टोयोटा इंनोवा क्रिस्टा ही गाडी क्षणार्धात जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने ठोकून चालली गेली. या वेळी त्या गाडीवरील चालकाने कुठलीही परिस्थिती न पाहता ठिकाणाहून पोबारा केला. ही घटना लक्षात येताच नाना हडपे यांना परिसरातील नागरिकांनी समर्पण हॉस्पिटल येथे दाखल केले. या घटनेची वाचत्ता पसरताच हॉस्पिटल ला गर्दी झाली होती.
अद्याप कारवाई नाही
याबाबत ड्रायव्हरने तीन दिसापूर्वी इतका मोठा अपघात करुन सुध्दा त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. तसेच त्या ड्रायव्हरला हा अपघात करायचा होता की करायला लावला? त्या जवळ पुन्हा गाडी देण्याचे कारण काय? की जसे हप्त्यांवर सर्वांना विकत घेऊ असे म्हणणाऱ्यांवर कुठलीही करवाई होत नाही का? असे एक ना अनेक सवाल भडगाव शहरातील सुज्ञ नागरिकांमध्ये चर्चिले जात आहेत.