Monday, January 30, 2023

अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वृद्धाकडून उकळले पैसे

- Advertisement -

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्हॉटसॲपवर व्हिडीओ कॉल करून अज्ञात महिलेनं वृध्दास अश्लिल व्हिडीओ तयार करण्यास भाग पाडून रेकॉर्ड केलेले व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देवून पैसे उकळल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील एका भागात ५७ वर्षीय व्यक्ती राहतात. १८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांना अनोळखी नंबरवरून एका महिलेचा व्हॉटसॲपवर Hi मॅसेज आला. त्यानंतर फिर्यादीशी जवळीकता साधून व्हॉटसॲपच्या व्हिडीओ कॉल करून तिचे अंगावरील कपडे काढून अश्लिल व्हिडीओ पाठविले. त्यानंतर ‘आप भी अपने कपडे उतारकर दिखाओ’ असे फिर्यादीस सांगितले.

- Advertisement -

फिर्यादीने देखील अंगावरील कपडे काढले. दरम्यान समोरील महिलेने लागलीच फिर्यादीचे कपडे काढलेला व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर लागलीच फिर्यादीला रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत १० हजार ५८० रूपयांची खंडणी मागितली. फिर्यादीने घाबरून महिलेच्या खाते क्रमांकावर पैसे पाठविले.

याप्रकरणी फिर्यादीने तातडीने जळगाव सायबर पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात दोन मोबाईलधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे