Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»15 ऑगस्टपूर्वी मुंबईत स्फोट घडवण्याची धमकी
    गुन्हे वार्ता

    15 ऑगस्टपूर्वी मुंबईत स्फोट घडवण्याची धमकी

    महापौरांच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्बस्फोटाचा मेल
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 7, 2026No Comments137 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. १५ ऑगस्टपूर्वी मुंबईतील विविध ठिकाणी हल्ला करण्याच्या धमकीचा मेल महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत इमेलवर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मेलमध्ये खालिस्तान समर्थनार्थ घोषणांचाही उल्लेख असल्याचे कळते. मुंबई पोलिसांकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आठवडाभरावर स्वातंत्र्यदिन साजरा होत असतानाच हा धमकीचा मेल आला आहे.

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेलवर हा धमकीचा मेल आला आहे. यात महापौर कार्यालय, मुंबई मेट्रो, शाळा आणि शेअर बाजार इमारतीत (स्टॉक मार्केट) स्फोट घडवून आणले जातील, अशी धमकी देण्यात आली आहे. या मेलमध्ये अनेक खालिस्तान समर्थकांची नावेही आहेत. हा मेल कोणी पाठवला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

    स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईत हे हल्ले घडवून आणू, असा उल्लेख या मेलमध्ये केला आहे. या पार्श्वभूमीवर ज्यांची मुले शाळेत जातात आणि मेट्रोने प्रवास करतात, अशा पालकांना सतर्क करण्यात आले आहे. तथापि, मुंबईच्या महापौरांना अशी धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशी धमकी देण्यात आलेली आहे.

    दरम्यान १० जून रोजी पाठवलेल्या एका मेलमध्ये मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE), मुख्यमंत्री कार्यालय आणि मुंबई महापालिकेची (BMC) इमारत, महापौर रितू तावडे यांचे कार्यालय आणि इतर ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. मात्र, तपासात हा मेल बोगस असल्याचे स्पष्ट झाले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना

    September 13, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif