Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    • फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
    • शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
    • गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»महाराष्ट्रातील अनेक जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवूण्याची धमकी
    गुन्हे वार्ता

    महाराष्ट्रातील अनेक जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवूण्याची धमकी

    राज्यभरात धमकीचा एकच ई-मेल पॅटर्न : पोलीस यंत्रणा सतर्क
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 2, 2026No Comments167 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यातील एकाच वेळी पाचहून अधिक जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर पोलिसांची एकच धावाधाव झाली. एका अज्ञात व्यक्तीने ई-मेलच्या माध्यमातून धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर पोलिसांनी जिल्हा न्यायालय परिसरात रिकामा केला. आता न्यायालयाला कोणी धमकी दिली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. आता पोलिसांनी न्यायालयाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

    सातारा जिल्हा न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा अज्ञात ई-मेलद्वारे मिळाली. या गंभीर प्रकारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व न्यायाधीश, वकील आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढून न्यायालयाची इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. सध्या संपूर्ण न्यायालय परिसराची कसून तपासणी सुरू आहे. सायबर पोलीस या धमकीच्या ई-मेलचा शोध घेत आहेत.

    ठाणे, हिंगोली, बीड जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची ईमेलद्वारे धमकी मिळाली. न्यायालयात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर संपूर्ण न्यायालय रिकामे केले. पोलीसांकडून तपासणी सुरू आहे. या धमकीमुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापुरातही जिल्हा व सत्र न्यायालयाकडून बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवण्याचे धमकी मिळाली. सोलापुरातही ईमेल द्वारे ही धमकी देण्यात आली आहे. धमकीचा मेल आल्यानंतर या ठिकाणी कोर्ट रिकामे करण्यात आले.

    हिंगोली जिल्हा न्यायलयाला देखील बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. अज्ञात मेल आल्यानंतर न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी परिसरात रिकामा करण्याचे आदेश दिले. त्यांतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसर रिकामा केला. घटनास्थळी पोलीस आणि बॉम्बशोधक पथक दाखल झालं आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी कोर्ट उडवून देण्याच्या धमकीचा मेल आल्यानंतर परभणीत देखील पोलीस बंदोबस्तात वाढ वाढवण्यात आला आहे. या सर्व न्यायालयांना अज्ञात मेलने धमकी मिळाली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!

    November 8, 2026

    फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif