Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»महायुतीत भाजप शिवसेना मैत्रीपूर्व लढतीचा विचार!
    संपादकीय

    महायुतीत भाजप शिवसेना मैत्रीपूर्व लढतीचा विचार!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 27, 2026No Comments288 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    महाराष्ट्रातील 17 जागांच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. वरिष्ठ पातळीवर भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांबाबत युती झाली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या एका जागेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात प्रतिष्ठेची जागा बनविण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या मुलासाठी ही जागा प्रतिष्ठेची बनवत आहेत. यावेळी ही जागा शिवसेनेला देण्याची मागणी त्यांनी केली आहे. शिवसेनेतर्फे प्रताप पाटील हे जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. त्यांचे ग्रामीण भागात दांडगा संपर्क आहे. त्यांना ही जागा मिळावी अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली आहे. आमचा मागण्याचा हक्क आहे. तो आम्ही शेवटपर्यंत मागत राहणार. शेवटी वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. परंतु ही जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. जर कदाचित ही जागा आम्हाला मिळाली नाही तर या जागेवर आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू. म्हणजे भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना होईल. मैत्रीपूर्ण लढतीमध्ये ज्याचे पारडे जड होईल अथवा शक्ती प्रदर्शनात जो वरचढ ठरेल तो निवडून येईल.

    एकूण नगरपालिका सदस्यांमध्ये एकूण 482 सदस्यांपैकी 179 सदस्य हे भाजपचे आहेत. तर 120 सदस्य हे शिवसेनेचे सदस्य आहेत. महापालिकेतील जळगाव मध्ये एकूण 75 सदस्य पैकी 46 सदस्य भाजपचे आहेत. तर 22 सदस्य हे शिवसेनेचे आहेत. म्हणजेच 359 सदस्यांपैकी शिंदे सेनेकडे 142 सदस्य हे भाजपचे आहेत. बाकी अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सदस्य आहेत. त्यामुळे संख्या बळाचा विचार केला तर भाजपकडे मोठे संख्याबळ आहे. त्या पाठोपाठ शिवसेनेकडे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे भाजपला ही जागा निवडणुकीसाठी सोपी जाणार आहेत. तथापि 142 सदस्य संख्या शिवसेनेकडे असताना त्यांना अपक्ष व इतरांचा पाठिंबा मिळेल असे गुलाबराव पाटील यांना वाटते. गुलाबराव पाटलांचे सदस्यांमध्ये असलेले वजन पाहता ही जागा आपण जिंकू शकू असा विश्वास त्यांना वाटतो. त्यामुळे जर ही जागा शिवसेनेला मिळाली नाही तर काही झाले तरीही जागा लढवायचीच असा निर्धार त्यांनी केला असल्याचे वृत्त आहे. म्हणजे शिवसेनेला जागा जर मिळाली नाही तर मैत्रीपूर्ण लढतीचा विचार पुढे करण्यात आला आहे. म्हणजे भाजप विरुद्ध शिवसेना अशी जागेसाठी लढत होण्याची शक्यता आहे. तसेच झाले तर परंपरेने ही जागा भाजपची असून ती जागा भाजपला मिळाली पाहिजे असे असा आग्रह भाजप तर्फे मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. भाजपकडे उमेदवार कमी आहेत. एक जागा दहा जण त्यासाठी तयार आहेत. अद्याप आमचा उमेदवार ठरलेला नाही पण ही जागा भाजपला द्यावी असा आमचा निर्धार आहे. मैत्रीपूर्ण लढत भाजप सेनेमध्ये निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लढतीत एकमेकांचे गोडवे तर गायले जाणार पण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील केले जातील, यात शंका नाही. अद्याप जागेचा तिढा सुटलेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख एक जून आहे. तोपर्यंत या जागेसाठी भाजप सेनेकडून उमेदवारी मिळावी म्हणून आग्रह राहणार आहे..!

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!

    September 16, 2026

    गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!

    September 15, 2026

    लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!

    September 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif