धक्कादायक; या नेत्याची गोळी झाडून हत्या…

0

 

गया, लोकशाही न्यूज नेटवर्क:

बिहारमधील गया जिल्ह्यातील जेडीयू पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कुमार सिंह यांची गोळी झाडून हत्या झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

सुनील कुमार यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. सुनील कुमार यांच्या हत्येने लोकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुनील कुमार यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबाने रुग्णालयात एकच टाहो फोडला. सत्ताधारी नेते सुरक्षित नाहीत, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

जेडीयू पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कुमार सिंह यांची गोळी झाडून हत्या झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुनील कुमार सिंह यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.