Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकार्थ»‘या’ बँकेचे येत्या तीन दिवसानंतर खातं होणार बंद!
    लोकार्थ

    ‘या’ बँकेचे येत्या तीन दिवसानंतर खातं होणार बंद!

    15 एप्रिलला डेडलाईन : तुमचं अकाऊंट तर नाही ना?
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 13, 2026No Comments632 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    आजकाल प्रत्येक बँक खात्याचे व्यवहार ऑनलाइन होत असतात, त्यामुळे बँकिंगही सोपं झाल आहे. मात्र आता एका बॅकेबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकचे (Punjab National Bank) ग्राहक असाल तर या बँक अकाऊंटबद्दल एक मोठा अलर्ट समोर आला आहे. 16 एप्रिलपासून काही खाती बंद केली जाऊ शकतात, असा खरं इशारा बँकेने मार्चमध्ये दिला होता. ही अशी खाती आहेत जी तीन वर्षांपासून निष्क्रिय आहेत, त्यात कोणताही व्यवहार झालेला नाही आणि ज्यामधील शिल्लक ही शून्य आहे. जर तुमचं बँक खातं या कॅटॅगरीमध्ये येत असेल, तर पटापटा आवश्यक कारवाई करा, अन्यथा कोणत्याही सूचनेशिवाय हे बँक अकाऊंट बंद (PNB Account Close Alert) केलं जाईल आणि मग पश्चातापाची वेळ येऊ शकते.

    पीएनबीच्या ज्या खातेधारकांनी गेल्या तीन वर्षांत कोणताही व्यवहार केलेला नाही आणि ज्यांच्या खात्यात कोणतीही शिल्लक अथवा निधी नाही, त्यांच्यासाठी 15 एप्रिल ही अंतिम मुदत आहे. या मुदतीपर्यंत ही बँक खाती ॲक्टिव्ह न केल्यास, ती बंद केली जातील. पंजाब नॅशनल बँकेने गेल्या महिन्यात, त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये एक महत्त्वपूर्ण इशारा देण्यात आला होता.

    पीएनबीने एका एक्स-पोस्टद्वारे (पूर्वीच ट्विटर) सूचना जारी केली होती की, अशी निष्क्रिय खाती ठराविर वेळेत ॲक्टिव्ह करणं आवश्यक आहे. मात्र असं केलं नाही तर 16 एप्रिल रोजी ही खाती निष्क्रिय करण्याची कारवाई केली जाईल. खाती ॲक्टिव्ह कशी करायची, त्याची प्रक्रिया देखील या सोशल मीडिया पोस्टमध्ये, बँकेने सांगितली आहे.

    पीएनबीचं असं खात पुन्हा ॲक्टिव्ह करणं खूप सोपं आहे. ज्यांचं या बँकेत अकाऊ्ंट आहे, ते खातेधारक 15 एप्रिलच्या डेडलाइनपूर्वी आपली खाती पुन्हा ॲक्टिव्ह करण्यासाठी जवळच्या बँक शाखेत जाऊ शकतात. तेथे जाऊन ‘नो युअर कस्टमर’ ((PNB KYC)) प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. केवळ एक साधं केवायसी अपडेट पूर्ण करून किंवा व्यवहार पुन्हा सुरू करून खाते बंद होण्यापासून वाचवता येईल.

    आता, पंजाब नॅशनल बँक अशी निष्क्रिय खाती बंद करण्याची कारवाई का करत आहे, हेही जाणून घेऊया. पीएनबीने आपल्या निवेदनात आधीच म्हटलं होतं की, या खात्यांशी संबंधित धोके कमी करणं हे यामागील कारण आहे. फसवणुकीच्या धोक्यामुळे, बँका अशा निष्क्रिय किंवा शून्य-शिल्लक खात्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ग्राहकांना त्यांच्या खात्याची स्थिती तपासण्यात काही अडचण आल्यास, त्यांनी त्यांच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पेट्रोल १८ रुपये, डिझेल २५ रुपयांनी महागण्याची शक्यता

    May 11, 2026

    एलपीजी सिलिंडरच्या नियमात पुन्हा मोठा बदल

    May 7, 2026

    युद्धात पाकिस्तानचे तीनतेरा : स्थिती अत्यंत वाईट

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif