Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    राजकारण

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    मनोज जरांगे पाटील मुंबईला जाणार नाहीत, असा दावा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 16, 2026No Comments92 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    काल मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्याचा पहिला मुक्काम पाटोद्यात पडला. मध्यरात्री त्यांनी समाज बांधवांशी हितगूज साधला. आज त्यांच्या उपोषणाचा 19 वा दिवस आहे. त्यातच त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने सकाळी त्यांची तब्येत अचानक खालावली. तर मुंबई पोलिसांनी त्यांचा परवानगी अर्ज प्रलंबित ठेवत त्यांना नोटीस बजावली. मुंबईतील आंदोलनाचा खुलासा त्यांच्याकडून मागवण्यात आला आहे. तर आग्रही मागणीनंतर जरांगे यांना सलाईन सुरू करण्यात आले आहे. या घडामोडींना वेग आलेला असतानाच प्राध्याक लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर सांगलीत जोरदार टीका केली आहे.

    ओबीसी आरक्षण संपलेलं आहे असे ठाम मत ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले. मनोज जरांगे पाटील मुंबईला जाणार नाहीत. हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे असा आरोपही त्यांनी केला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील लोकांनी जरांगेंना मोठं केल्याचे ते म्हणाले.

    सांगलीच्या तानाजी पाटील यांनी बोगस कुणबी प्रमाणपत्र घेऊन आपल्या मुलाला सभापती केला असल्याचा गंभीर आरोप प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांनी करत मी मराठा नाही हे आटपाडीच्या तानाजी पाटील यांनी जाहीर करावं असं जाहीर आव्हान लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे दौंडमार्गे मुंबईकडे जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. कोर कमिटीतील सदस्य आणि नेते प्रदीप साळुंखे यांनी दौंड येथे मराठा बांधवांची बैठक घेतली. यावेळी जळांगे पाटील जास्त वेळ थांबणार नाहीत कारण त्यांची तब्येत खराब आहे. समाज बांधवांनी माझ्यासोबत येऊ नये असे आव्हान देखील जरांगे पाटलांनी केले आहे, असे ते म्हणाले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif