घराबाहेर चावी ठेवण पडलं महागात; चोरट्यांनी भरदिवसा फोडलं घर…

0

 

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात शिरसाळे या गावात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुरूवारी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी घराबाहेर ठेवलेल्या चावीने घराचे कुलूप उघडत कपाटातून 62 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.

अमळनेर तालुक्यातील शिरसाळे गावात शेतकरी असलेले भटू शिवदास पाटील (50) हे वास्तव्यास आहेत. बुधवार, 15 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्याने बाहेर ठेवलेल्या चावीने दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून 50 हजारांची रोकड तसेच 12 हजारांचे दागिने असा एकूण 62 हजारांचा ऐवज लांबवला. भटू पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर गुरुवारी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हवालदार भरत ईशी हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.