गुप्तांगाला बाम लाऊन तरुणाला बेदम मारहाण

व्हिडिओ बनवून प्रसारित केला : तिघांना अटक

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

पिंपरी चिंचवड शहरातील आयटीसीटी हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. यात एका वीस वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर त्याच्या गुप्तांगाला बाम लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील मारुंजी येथील पनाची सोसायटी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सदर तरुण हा पनाची सोसायटी या ठिकाणी आपल्या मित्राच्या फ्लॅटमध्ये भेटायला गेला होता. त्या दरम्यान राम तुळशीराम गंभीरे याने तक्रारदार तरुणाच्या हातात सिगरेट दिली. मात्र सिगरेट तक्रारदार तरुणाच्या हातातून खाली पडली. त्यानंतर तक्रारदार तरुणाने राम गंभीरेला सिगरेट उचलून दिली.

सिगरेट उचलून दिल्याचा राम गंभीरे याला तरुणाचा अतिशय राग आला. यावरून त्याने तू माझी बरोबरी करतो का? असं म्हणत राम गंभीरे यांनी तक्रारदार तरुणाला लाथा- बुक्क्याने तसेच त्याच्या हातातील धातूच्या कड्याने बेदम मारहाण करण्यास सुरू केली. त्यानंतर त्याच्या गुप्तांगाला बाम लावून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर बनवून प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार केला आहे.

सदरच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून हिंजवडी पोलिसांत तक्रार दाखल केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंजवडी पोलिसांनी राम तुळशीराम गंभीरे याच्यासह त्याला मदत करणारे श्रेयस संजय कवडे आणि ललित प्रमोद भदाणे या तीन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.