नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क;
जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील बल्लूर येथे मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वडिलांनी बिडी पिल्यावर ती अनवधानाने घरात ठेवलेल्या शेतीसाठी लागणाऱ्या फवारणी करणाऱ्या टाकीवर फेकली आणि जोरदार भडका उडाला. त्यात घरातील तिघांचा मृत्यु झाला.
सुर्यकांत सक्रप्पा (५२), गंगुबाई सुर्यकांत सक्रप्पा (५०) आणि मुलगा कपिल सुर्यकांत सक्रप्पा याचा मृत्यू झाला. या घटनेने सारा परिसर हळहळ व्यक्त करत आहे.