Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»मोदींना झालमुडी देणारा विक्रेता अडचणीत : थेट धमक्या
    राजकारण

    मोदींना झालमुडी देणारा विक्रेता अडचणीत : थेट धमक्या

    पाकिस्तान, बांग्लादेशमधून फोन : परिवार दहशतीत
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 22, 2026No Comments563 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पश्चिम बंगाल मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रस्त्यावर झालमुडी खाऊ घालणारे स्थानिक विक्रेते बिक्रम साऊ यांना आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

    पंतप्रधान मोदी यांच्या झाडग्राम येथील निवडणूक सभेनंतर त्यांचा ताफा परत जात असताना अचानक झालमुडी विक्री करणाऱ्या बिक्रम साऊ यांच्या दुकानाजवळ थांबला होता. यावेळी त्यांनी स्वतः तयार केलेली झालमुडी पंतप्रधानांना दिली होती. या घटनेचा व्हिडिओ पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर बिक्रम साऊ यांना मोठी प्रसिद्धी मिळाली.

    मात्र ही प्रसिद्धी आता त्यांच्या अडचणी वाढवणारी ठरत असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे कॉल पाकिस्तान आणि बांगलादेशमधून येत असल्याचा दावा केला जात आहे.

    या धमक्यांमुळे त्यांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिक्रम साऊ यांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर परिसरातही चिंता व्यक्त केली जात असून अचानक मिळालेल्या प्रसिद्धीचा फटका सामान्य विक्रेत्याला बसल्याची चर्चा सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस

    September 16, 2026

    धनंजय मुंडे तातडीने रूग्णालयात दाखल

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif