गरोदर स्त्रीला चिरडल्याची दुर्दैवी घटना; मुलगी मात्र सुखरूप…

0

 

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क;

उत्तर प्रदेशाच्या फिरोजाबादेत पतीसह माहेरी जात असतांना ट्रकने गरोदर स्त्रीला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत ट्रक महिलेच्या अंगावरून गेल्यामुळे तिचे पोट फाटले. त्यात तिच्या गर्भातील मुलगी 5 फूट अंतरावर जाऊन पडली. हे हृदयद्रावक दृश्य पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले. महिलेच्या शरीराचे तुकडे झाले. पण सुदैवाने मुलगी वाचली होती.

पती रामूने सांगितले की, माझ्या डोळ्यापुढे ट्रकने कामिनीला चिरडले. तिचा तडफडून मृत्यू झाला. तिच्या शरीरात काहीच उरले नव्हते. तर दुसरीकडे माझी मुलगी रस्त्यावर पडून रडत होती. दुसरीकडे, महिलेच्या निधनाच्या धक्क्यामुळे तिच्या चुलत्याचाही मृत्यू झाला आहे. महिला व तिच्या चुलत्यावर बुधवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

आग्रा जिल्ह्याच्या धनौला येथील रहिवासी रामू बुधवारी पत्नी कामिनीसह दुचाकीवरून आपल्या सासुरवाडीला जात होता. त्याची सासुरवाडी फिरोजाबादच्या नारखी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वजीरपूर कोटला होते. त्याने सांगितले -‘पत्नी 9 महिन्यांची गरोदर होती. तिने तिला माहेरच्यांची आठवण येत आहे. मूल झाल्यानंतर 4 महिने जाता येणार नाही, असे तिचे म्हणणे होते. त्यामुळे सकाळी 9 वाजता तिला घेऊन मी सासुरवाडीला निघाले. आम्ही ढाब्यावर चहा घेतला. त्यानंतर 5 किमी अंतरावर एका वेगवान ट्रकने आमच्या दुचाकीला पाठीमागून टक्कर मारली. त्यानंतर कामिनी दुचाकीवरून रस्त्यावर पडली.’ अस रामूने सांगितले.

आमच्या लग्नाला 3 वर्षे झाले होते. हे आमचे पहिलेच मूल होते.’

 

या अपघाताचे वृत्त ऐकताच कामिनीचे चुलते कालीचरण यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांना कर्करोग होता. त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले की, चुलते खूप दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे आम्ही त्यांना कामिनीच्या मृत्यूची बातमी सांगितले नाही. सकाळीच त्यांची कामिनीशी चर्चा झाली होती. ती त्यांच्या अतिशय जवळ होती. यामुळे तिच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचाही मृत्यू झाला. नातेवाईकांनी या दोघांच्याही मृतदेहांवर बुधवारी सायंकाळी अंत्यसंस्कार केले. जिल्हा रुग्णालयाचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर एल.के.गुप्ता यांनी सांगितले की, मुलीची प्रकृती आता झपाट्याने सुधारत आहे. पडल्यामुळे तिला मुक्का मार लागला आहे. तिच्या पोटात अंतर्गत जखम झाली आहे. गुरूवारी सकाळी तिला दूध देण्यात आले. पण तिने पिले नाही. दूध पचेपर्यंत ती रुग्णालयातच राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.