रात्रीच्या सुमारास उच्चभ्रू नागरी वस्तीत दरोड्याचा थरार

वयोवृद्ध व्यक्तीला केले बंधक : पोलीस येण्याआधीच...

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

पिंपरी चिंचवड शहरात रात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरोडेखोरांनी रात्रीच्या सुमारास उच्चभ्रू नागरी वस्तीत प्रवेश करत याठिकाणी ज्येष्ठ नागरिकाला बंधक बनवून चोरट्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला. पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण येथील धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रात्रीच्या अंधारात चोरटे बंद घरांना लक्ष करत असतात. तर काही ठिकाणी घरात लोक असताना शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकत असतात. असाच प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण या उच्चभ्रू नागरी वस्तीत रात्रीच्या सुमारास घडला आहे. मात्र चोरट्यांचा हा प्रयत्न फसला आहे.

दरम्यान उच्चभू लोकांच्या वस्तीतील ज्येष्ठ नागरिकाला बंधक बनवून चोरट्याने चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण येथील चंद्रविले बंगल्यात घडला आहे. जवळपास अर्धा तास ज्येष्ठ नागरिकांना दरोडेखोरानी बंधक बनवून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ज्येष्ठ नागरिकांनी कसेतरी दरोडेखोरांच्या तावडीतून स्वतःची सुटका केली.

ज्येष्ठ नागरिकांनी सुटला केल्यानंतर बंगल्याच्या गॅलरीमध्ये येऊन आरडाओरडा केल्याने त्याचे जीव वाचला आहे. तर या संदर्भातील माहिती निगडी पोलिसांनी मिळतच पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या बंगल्याला चारही बाजूने वेढा धरून ज्येष्ठ नागरिकाची दरोडेखोरांच्या तावडीतून सुटका केली आहे. मात्र पोलिस येण्याच्या अगोदच दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.