अर्थशास्त्र लेखमाला : भाग २३
कोणत्याही उपभोग्य वस्तूच्या सेवनापासून उपभोक्त्याला समाधान प्राप्त होते. उपभोग्य वस्तूच्या उपयोगितेचे मापन समाधानाच्या एककांत किंवा अंशांत करतात. उपभोक्त्याजवळील वस्तूचे परिमाण वाढत असताना समग्र उपयोगिता वाढत जाणे स्वाभाविक आहे परंतु जसजसे वस्तूचे परिमाण वाढत राहते, तसतसे समग्र उपयोगितेच्या वाढीचे प्रमाण कमी कमी होत जाते. उपभोक्त्याच्या दृष्टीने दोन सफरचंदांची समग्र उपयोगिता तीन सफरचंदांच्या समग्र उपयोगितेपेक्षा कमी असते, म्हणजे सफरचंदांच्या परिमाणात एका सफरचंदाची भर पडल्यामुळे तीन सफरचंदांची समग्र उपयोगिता दोन सफरचंदांच्या समग्र उपयोगितेपेक्षा अधिक होते. वस्तूच्या परिमाणात वाढ झाल्याने समग्र उपयोगितेत जी वाढ होते, तिला सीमांत उपयोगिता म्हणतात. समजा, एका सफरचंदाची समग्र उपयोगिता १० एकक आहे, तर त्याची सीमांत उपयोगिता १० एककच राहील. दोन सफरचंदांची समग्र उपयोगिता १६ एकक आहे आणि तीन सफरचंदांची समग्र उपयोगिता २० एकक आहे, तर दोन सफरचंदांची सीमांत उपयोगिता सहा आणि तीन सफरचंदांची सीमांत उपयोगिता चार होईल.


समग्र उपयोगिता व सीमांत उपयोगिता ह्यांतील परस्परसंबंध सोबतच्या तक्त्यावरून स्पष्ट होईल. वरील तक्त्याच्या साहाय्याने खालील आकृती काढलेली आहे.
उपभोक्त्याजवळ उपभोग्य वस्तूचे परिमाण प्रमाणाबाहेर वाढले, तर उपभोक्त्याला त्या वस्तूचा उबग येईल आणि तरीसुद्धा जर तो सेवन करीत राहिला, तर समग्र उपयोगिताच घटेल म्हणजे त्या परिमाणाची सीमांत उपयोगिता ऋण होईल (पाचव्या सफरचंदाची उपयोगिता-५ होईल). वस्तूच्या सेवनाबाबतचा उपभोक्त्याचा हा अनुभव सीमांत उपयोगितेच्या नियमात ग्रथित केला आहे. ॲल्फ्रेड मार्शलने नमूद केल्याप्रमाणे तो नियम असा :‘उपभोक्त्याजवळील कोणत्याही वस्तूचे परिमाण जसजसे थोड्या थोड्या अंशाने वाढत जाते, तसतसे परिमाणाच्या प्रत्येक अंशवाढीगणिक उपभोक्त्याच्या समाधानात होणारी वाढ कमी कमी होत जाते’.
या सीमांत उपयोगिता-नियमाच्या शर्ती अशा : (१) उपभोक्त्याची आवड कायम राहिली पाहिजे, (२) त्याच्या मानसिक अवस्थेत बदल होता कामा नये, (३) वस्तूचे सर्व नग एकजिनसी असले पाहिजेत, (४) उपभोक्त्याने एकाच वस्तूच्या सेवनावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि (५) वस्तूंच्या लागोपाठच्या एककांच्या सेवनात खंड पाडता कामा नये.
घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे
अपवाद : या सिद्धांताला पुढील घटक अपवाद सांगितले जातात मात्र ते अपवाद नसून त्यांनाही सिद्धांत दिसून येतो हे स्पष्ट करता येते
1) दुर्मिळ वस्तू नाणी व चित्रे : दुर्मिळ वस्तू दुर्मिळ नाणी दुर्मिळ चित्रे तिकिटे जमा करण्याचा छंद याला सिद्धांत दिसून येत नाही कारण अशा व्यक्तीला या दुर्मिळ वस्तूंचा साठा वाढत गेल्यास त्याचा आनंद सीमान्त एकदा वाढत जाते. मात्र या ठिकाणी वस्तूचा एकसारखेपणा गृहीत धरल्यास एकच दुर्मिळ चित्र एकच नाणी एकच मूर्ती त्याला मिळत गेल्यास उपयोगिता कमी होऊन सिद्धांत दिसून येतो
2) मादक वस्तू : व्यसनी व्यक्तीला मादक वस्तू सिगारेट तंबाखू मिळत गेल्यास त्याची उपयोगिता वाढत जाते व सिद्धांत दिसून येत नाही मात्र हा आभास आहे सिद्धांतातील विवेकशीलता गृहीत धरल्यास मादक पोस्टमुळे व्यसनी व्यक्तीला चांगले वाईट कळत नाही अशा लोकांचा सिद्धांत विचार करत नाही. .
3) वाचन तसेच संगीत : दुकान चे वाचन करणे तसेच संगीत शिकणे हा छंद असणाऱ्या व्यक्तीला विविध पुस्तके व विविध संगीत मिळाल्यास त्याची उपयोग घेता वाढत जाते यांना सिद्धांत दिसून येत नाही मात्र सिद्धांतातील वस्तूचा एकसारखेपणा गृहीत धरल्यास एकच संगीत एकच पुस्तक वाचण्यासाठी दिल्यास त्याचा कंटाळा येऊन सिद्धांत दिसून येतो.
4) सत्ता : व्यक्तीला सत्ता मिळत जाते तशी तो आणखी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतो याला सिद्धांत दिसून येत नाही मात्र सिद्धांतातील गृहीतक विवेकशीलता या ठिकाणी दिसून येत नाही शेवटी व्यक्तीलाही सत्तेचा कंटाळा येतोच
5) कंजूष व्यक्ती : कंजूष व्यक्ती प्रत्येक वस्तू कमी किमतीत खरेदी करून जास्त उपयोगिता मिळवतो त्यामुळे अशा व्यक्तीला सिद्धांत दिसत नाही असे म्हटले जाते मात्र याठिकाणी सिद्धांतातील गृहीत विवेकशीलता याचे उल्लंघन दिसते तसेच अशा व्यक्तीला दुसऱ्याने कमी किमतीला वस्तू खरेदी केलेली आहे असे सांगितल्यास त्याच्या जवळील वस्तूची उपयोगिता त्याला कमी जाणवते व सिद्धांत दिसतोच.
6) पैस : व्यक्ती जवळील पैशाच्या साठा वाढत असताना तो आणखी वाढवा असे व्यक्तीला वाटते म्हणजेच पैशाची सीमांत उपयोगिता वाढत जाते व पैशाला सिद्धांत दिसत नाही असे म्हटले जाते मात्र हे चुकीचे असून पैशाचा साठा वाढल्यानंतर पैशाचे महत्त्व किंवा उपयोगिता कमी होते व सिद्धांत दिसून येतो उदा व्यक्ती गरीब असताना 50रूपयात सीमांत उपयोगिता जास्त जाणवते मात्र तोच व्यक्ती श्रीमंत झाल्यानंतर याच 50रुपयात उपयोगिता जाणवत नाही म्हणजेच गरिबांना पैशात सीमांत उपयोगिता जास्त जाणवते तर श्रीमंत व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता कमी जाणवते व सिद्धांत दिसतो मात्र या ठिकाणी इतर वस्तूंप्रमाणे पैशाची सीमांत उपयोगिता कधीही शून्य होत नाही. अशाप्रकारे या सिद्धांताला वरील घटक अपवाद सांगितले जातात.

लेखिका : प्राध्यापिका (अर्थशास्त्र)
मेल. drritashetiya14@gmai.com