किराणा दुकान फोडले; मालासह ४० हजाराची चोरी…

0

 

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क:

पाचोरा तालुक्यातील निंभोरी बु” येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास किराणा दुकानात चोरी (Grocery store theft) झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे.

दुकान मालक विकास परमेश्वर शेळके (Shop owner Vikas Parameshwara Shelke) हे मंगळवारी रात्री आठ वाजता दुकान बंद करून घरी गेले. तसेच ते नित्यनियमाप्रमाणे आज २३ रोजी बुधवारी सकाळी ६.४५ वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना सदरचा प्रकार निदर्शनास आला. अज्ञात चोरट्याने कटरने दुकानाचे शटर तोडून दुकानातील प्रिंटर, तीन तेलाचे डबे, तिन पिशव्या, चार्जर सह इतर किराणा माल आणि सोबतच ड्रावरमधील रोख २ हजार ५०० रुपये चोरी करून पसार झाले. शेळके यांनी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.