मुंबई
संभाजी ब्रिगेड राज्यात ५० पेक्षा जास्त उमेदवार जाहीर करणार आहेत. अश्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात मोठी बातमी समोर आली आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेने याच्यातील युती तुटण्याचे संकेत स्पष्ट होत आहे. शिवसेना ठाकरे गटासोबत अडीच वर्षे असणारी युती संभाजी ब्रिगेड तोडणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे टेन्शन वाढणार आहे.
संभाजी ब्रिगेडसाठी असणाऱ्या जागांवरती उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेड नाराज असून त्यांनी आता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी ब्रिगेड शिवसेनेसोबत असणारी अडीच वर्षांची युती तोडणार आहे. लवकरच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे भूमिका जाहीर करणार आहेत. संभाजी ब्रिगेडच्या या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
महत्वाचे म्हणजे, संभाजी ब्रिगेडच्या एका शिष्टमंडळाने मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेड मनोज जरांगें यांचयबरोबर जाणार आहेत. मराठा क्रांती मोर्चा आता नेमकी कोणाला उमेदवारी देतंय हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.