Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»तटकरे कुटुंब भाजपमध्ये प्रवेश करणार होते!
    राजकारण

    तटकरे कुटुंब भाजपमध्ये प्रवेश करणार होते!

    आमदाराच्या खळबळजनक दाव्याने राजकीय भूकंप
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 3, 2026No Comments185 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    तटकरे कुटुंब भाजापात जाणार असल्याचा दावा शिंदेंच्या आमदाराने केल्याने रायगडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे कुटुंबाबाबत अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. तटकरे कुटुंब हे भाजपमध्ये प्रवेश करणार होतं, असा थेट आरोप करत दळवी यांनी केला आहे. दळवींच्या या दाव्याने महायुतीतील अंतर्गत राजकीय वादाला पुन्हा एकदा तोंड फोडलं आहे.

    एवढ्यावरच न थांबता, महेंद्र दळवी यांनी अनिकेत तटकरे यांच्यावर अत्यंत शेलक्या अन् बोचऱ्या शब्दांत टीका केली. अनिकेत तटकरे हे सरोगसी बाळ आहेत, असा वादग्रस्त उल्लेख दळवी यांनी केला. दळवी यांच्या या वक्तव्यानंतर रायगडसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) आता यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आमदार अनिकेत तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली. विधान परिषद निवडणुकीचा उल्लेख करत दळवी यांनी अनिकेत तटकरे यांना ‘सरोगसी बाळ’ अशी उपमा दिली. भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यामुळेच हे ‘सरोगसी बाळ’ जन्माला आले, असा थेट हल्लाबोल आमदार दळवी यांनी केला.

    अनिकेत तटकरेंनी सरोगसी बाळ म्हणजे काय हे आधी आपल्या बापाला विचारावे; म्हणजे तटकरेंनी अशी किती सरोगसी बाळे जन्माला घातली आणि वाऱ्यावर सोडून दिली, हे देखील समोर येईल, अशा शब्दांत दळवी यांनी टीकेची झोड उठवली. नेहमीप्रमाणे सर्व काही स्वतःच्याच घरात हवे, हा तटकरेंचा स्वभाव आहे. आज जर अजित पवार (सक्रिय) असते, तर सुनील तटकरे यांना पक्षातून बाहेर काढण्याची तयारी पूर्ण झाली होती. एवढेच नव्हे, तर तटकरे कुटुंब स्वतः भाजपमध्ये प्रवेश करणार होते, असा दावाही दळवी यांनी केला.

    रायगडचे नवनिर्वाचित पालकमंत्री भरत गोगावले यांच्या नागरी सत्कार समारंभात आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनील तटकरे यांच्यावर जोरदार तोफ डागली. तटकरे आणि राष्ट्रवादीकडून होणाऱ्या राजकारणाचा उल्लेख करत, थोरवे यांनी भरत गोगावले यांना सावध राहण्याचा सल्ला दिला. परवापासून आम्हाला काही सांगू नका. महेंद्र दळवी यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही एकदा संघर्ष सुरू केला, की मग थांबणार नाही, असा निर्वाणीचा इशाराच आमदार थोरवे यांनी व्यासपीठावरून दिला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif