उमेदवाराचे ‘प्रतिज्ञापत्र’ ठरतेय्‌ चर्चेचा विषय!

वचनाम्याला दिला फाटा : चेतन महाले यांना प्रतिसाद

0

जळगाव : शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक रणधुमाळीला वेग आला असताना, प्रभाग क्रमांक 6 ब मधून चेतन सुरेश महाले यांनी आपले हटके आणि सर्वसमावेशक ‘प्रतिज्ञापत्रा’ने लक्ष वेधून घेतले आहे. ‘शहर केवळ वाढवायचे नाही, तर जगण्यालायक बनवायचे’ असा स्पष्ट संदेश देणारा हे प्रतिज्ञापत्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
तरुण, ऊर्जावान आणि जनतेतून आलेले उमेदवार अशी ओळख असलेले चेतन महाले यांनी स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, महिला व बालसुरक्षा अशा सर्वच मूलभूत मुद्द्यांना आपल्या प्राधान्यक्रमात स्थान दिले आहे. विकास म्हणजे फक्त इमारती नव्हेत, तर माणसांचे जीवनमान उंचावणे, असा त्यांचा ठाम विश्वास जाहीरनाम्यातून अधोरेखित होतो. नियमित रस्ते स्वच्छता, आधुनिक कचरा व्यवस्थापन, वृक्षलागवड आणि प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी, टंचाईमुक्त व्यवस्था, प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करणे, तसेच शाळा व महाविद्यालयांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावणे ही प्रमुख आश्वासने जाहीरनाम्यात नमूद आहेत. महिला सुरक्षेसाठी विशेष योजना, बालकांसाठी सुविधा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ सेवा निर्माण करण्याचा संकल्पही त्यांनी मांडला आहे.
नागरिकांचा निर्णयप्रक्रियेत सहभाग वाढवणे, महापालिकेचे व्यवहार पारदर्शक ठेवणे आणि भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेण्याचे आश्वासन देत त्यांनी ‘जबाबदार नेतृत्वा’चा सूर लावला आहे. छत्री हे निवडणूक चिन्ह घेऊन मैदानात उतरलेले चेतन महाले, विकासाचा ‘पाऊस’ पाडतील अशा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.