Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»उन्हाच्या झळांसोबतच पाण्यासाठी वणवण!
    ताज्या बातम्या

    उन्हाच्या झळांसोबतच पाण्यासाठी वणवण!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 21, 2026No Comments77 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगावातील स्थिती : मनपाच्या ढिसाळ नियोजनामुळे मनस्ताप
    जळगाव – वाढत्या उन्हाळ्यामध्ये पाण्याचा वापर वाढला असतानाच, जळगाव शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या वेळापत्रकाचा पुरता बुरखा फाटला आहे. गुरुवारी (शनिपेठ) परिसरात तर परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, तीन दिवसांपूर्वी आलेले पाणी चौथ्या दिवशीही वेळेवर न आल्यामुळे नागरिकांची प्रचंड कोंडी झाली आहे. ऐन उन्हाळ्यात मनपा प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेमुळे संतप्त नागरिकांमधून पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा असा संतप्त सूर उमटत आहे.
    उन्हाळ्यात लहान मुले, वृद्ध आणि घरगुती कामांसाठी पाण्याचा वापर वाढतो. अशा संवेदनशील काळात महानगरपालिकेने पाण्याचे नियोजन चोख ठेवणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा थेट एक दिवस पुढे ढकलला. मनपाच्या या मनमानी कारभारामुळे नोकरदार, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी धांदल उडाली. पाणी कधी येईल याचा नेम नसल्याने नागरिकांना रात्री-अपरात्री जागून काढावी लागत आहे. आम्ही मनपाचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वेळेवर भरतो, मग आम्हाला मूलभूत सुविधांसाठी का भीक मागावी लागत आहे? असा संतप्त सवाल शनिपेठ परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
    महापालिकेने शहरात दररोज आणि पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करण्याचे दिलेले आश्वासन पूर्णपणे फोल ठरले आहे. विना मोटरने दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी चढणार असा दावा करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचे सगळे दावे फेल झाले असून, आता नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एकीकडे मुलभूत सुविधा पुरवण्यात महापालिका अपयशी ठरली असताना, दुसरीकडे मात्र नागरिकांच्या घरावर पाण्याचे मीटर बसवण्याची तयारी सुरू झाल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. वेळेवर कर वसूल करताना तत्परता दाखवणारे मनपा प्रशासन पाणी देण्याच्या वेळेस मात्र सुस्त का असते, असा रोकडा सवाल आता नागरिक विचारत आहेत. कर भरूनही जर पाणी आणि इतर सुविधा मिळत नसतील, तर नागरिकांनी करायचे काय? असा उद्विग्न प्रश्न आता निर्माण झाला आहे.प्रशासकीय अनास्थेचा कळसशहरातील पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून, अधिकाऱ्यांचे यावर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. पाणी टंचाईमुळे नागरिकांना खाजगी टँकर्सचा आधार घ्यावा लागत असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मनपाच्या या अजब कारभारामुळे जळगावकरांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif